‘प्रा. ज्ञानदेव सांगळे सर’ यांना शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे ‘जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर
‘प्रा. ज्ञानदेव सांगळे सर’ यांना शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे ‘जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर
कोपरगाव । विनोद जवरे ।
शिक्षण, कृषी, सहकार, संरक्षण, साहित्य, समाजकारण, राजकारण या सर्व क्षेत्रांना स्पर्श करत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आणि आपल्या पाऊलखुणा रुजवत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची कवाडे खुली करणारे शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे उर्फ अण्णा यांची ८४ जयंती १ मार्च रोजी थाटामाटात साजरी होत आहे. अण्णांच्या जयंती निमित्त विविध समाजोपयोगी व शिक्षणोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जयंती सोहळ्यातील मुख्य आकर्षण म्हणजे शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे प्रतिष्ठान व रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने दिला जाणारा ‘जीवनगौरव पुरस्कार’ होय. या पुरस्काराचे हे प्रथमवर्ष असुन हा पुरस्कार सामाजिक, आध्यात्मिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय, अतुलनिय, उत्कृष्ठ असे योगदान देऊन कार्य करणाऱ्या प्रा.श्री.ज्ञानदेव नामदेवराव सांगळे यांना जाहीर झाला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीरजी तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे व विविध क्षेत्रांतील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत दि. १ मार्च २०२२ रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. ५००१/- रुपये रोख, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असुन सदर पुरस्काराची मुळ संकल्पना विश्वभारती रुरल एज्युकेशन संस्थेचे कार्यकारी संचालक आकाशजी नागरे यांची आहे तर संस्थचे अध्यक्ष श्री. कांतीलालजी अग्रवाल, सचिव श्री. संजयजी नागरे, विश्वस्त श्री. मनोजशेठ अग्रवाल, विश्वस्त श्री. आनंदजी दगडे, विश्वस्त सौ. वनिताताई नागरे, प्रशासक सुरेशजी शिंदे या निवड समितीच्या अंतर्गत सर्वानुमते श्री. ज्ञानदेव सांगळे सर यांची पुरस्कारासाठी निवड झाली असुन त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा सपत्नीक सत्कार ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन होणार आहे.