ब्रेकिंग
मंजूर हंडेवाडी सोसायटीच्या निवडणुकीत काळे गटाचा दारुण पराभव.
विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सर्व जागा कोल्हे गटाने जिंकल्या.
मंजूर हंडेवाडी सोसायटीच्या निवडणुकीत काळे गटाचा दारुण पराभव

कोपरगांव । विनोद जवरे ।
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मंजुर हंडेवाडी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षीक निवडणुकीत काळे गटाच्या सर्व १३ उमेदवारांचा दारुण पराभव करत सर्व जागा भाजपाचे युवा नेते व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हे गटाने जिंकल्या आहे. विजयी उमेदवारांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. बी. क्षीरसागर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिव अण्णासाहेब निकम यांनी काम पाहिले. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे भास्करराव तिरसे (२६७) संभाजी गावंड (२५८) रामनाथ भोसले (२४८) साहेबराव तिरसे ( २४७) किसन भोसले (२४६) शिवाजी घुमरे (२४३) संजय कोकाटे (२४२) राधाकृष्ण गवळी (२४२) चंद्रकांत पगारे (२४४) यशोदाबाई बबन घुमरे (२३५), शितल गणेश पायमोडे (२३५) एकनाथ गायखे (२७१) माधव गोसावी (२५७) विजयी उमेदवारांचे कोळपेवाडी परिसरात सर्वत्र स्वागत होत आहे.