शिवरात्र निमित्त खांडेश्वराची आ. डॉ तांबे व सौ दुर्गाताई तांबे यांच्याकडून पूजा
शिवरात्र निमित्त खांडेश्वराची आ. डॉ तांबे व सौ दुर्गाताई तांबे यांच्याकडून पूजा
संगमनेर । विनोद जवरे ।
संगमनेर तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खांडगाव येथील खंडेश्वर यांची शिवरात्री निमित्त विधिवत पूजा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते संपन्न झाली.श्री.क्षेत्र खांडेश्वर महादेव मंदिर,खांडगाव येथे महाशिवरात्री निमित्त महापुजावेळी देवस्थानचे अध्यक्ष.लहानुभाऊ गुंजाळ,उपसभापती नवनाथ अरगडे,जि.प.सदस्य मिलिंद कानवडे,नबाजी गुंजाळ, .रमेश गुंजाळ , अॅड. मधुकर गुंजाळ, संतोष मांडेकर,रावसाहेब गुंजाळ,भास्कर गुंजाळ,विठ्ठल अप्पा गुंजाळ,अॅड विठ्ठल गुंजाळ,डाॅ.नामदेव गुंजाळ,त्र्यंबक गुंजाळ,विठ्ठल गोसावी, दशरथ बालोडे ,सचिव प्राचार्य अशोक गुंजाळ आदी उपस्थित होते यावेळी देवस्थान समितीच्या वतीने आमदार तांबे व सौ दुर्गाताई तांबे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना आमदार डॉ तांबे म्हणाले की ,खांडेश्वर हे संगमनेर तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. संगमनेर शहरातील अनेक नागरिक बंधू-भगिनी दररोज येथे पायी दर्शनासाठी येतात.महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विकास निधीतून या परिसराचा मोठा कायापालट झाला आहे . अध्यात्मा बरोबर निसर्गसंपन्न व शांततेचे वातावरण हे खांडगाव चे वैशिष्ट्य राहिले आहे. विज्ञानाच्या पुढे अध्यात्म असून मनशांतीसाठी चिंतन-मनन यावर अधिक भर दिला पाहिजे.तर सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची नामदार बाळासाहेब थोरात या ही खांडेश्वर महादेवावर नितांत श्रद्धा आहे. देवस्थानने स्वच्छता व विकास कामातून हा परिसर अत्यंत सुंदर बनविला आहे यावेळी शिवरात्री निमित्त हजारो भाविक दर्शनाला आले या प्रसंगी लहान भाऊ गुंजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉ तांबे यांनी अभिष्टचिंतन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एडवोकेट मधुकर गुंजाळ यांनी केले तर रमेश गुंजाळ यांनी आभार मानले