ब्रेकिंग

बिपीनदादा कोल्हेंनी केले गुरू शुक्राचार्य पालखीचे पुजन

बिपीनदादा कोल्हेंनी केले गुरू शुक्राचार्य पालखीचे पुजन

कोपरगांव । विनोद जवरे ।

कोपरगांव बेट ऐतिहासिक भूमी असून महाशिवरात्र पर्वकाळ येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, मात्र गेल्या २ वर्षापासून कोरोना परिस्थीतीमुळे हा पर्वकाळ साध्या पद्धतीने साजरा झाला, सालाबादप्रमाणे यावर्षी गुरु शुक्राचार्य पालखी गंगा गोदावरी भेटीसाठी आणण्यात आली होती त्याचे पुजन व अभिषेक सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.
प्रारंभी गुरु शुक्राचार्य देवस्थानचे बाळासाहेब आव्हाड यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष दत्तात्र्यय काले, दादासाहेब नाईकवाडे, महेंद्र नाईकवाडे, विशाल सुपेकर, कचरू लोहकरे, अनिल आव्हाड, विशाल आव्हाड, आदिनाथ ढाकणे, अमित गीते, विजय सुपेकर, तेजस गिते, भागचंद रुईकर, गोविंद शिंदे, नरेंद्र आव्हाड, सचिन सावंत, नितीन सावंत, योगेश कांगणे, विशाल राऊत, प्रसाद पऱ्ये, राजेंद्र आव्हाड, विजय रोहोम, विलास आव्हाड, बाळासाहेब लकारे, सुनिल पांडे, रावसाहेब सुपेकर, समिर सुपेकर, भाऊ वायखिंडे, जयप्रकाश आव्हाड, अनिल नाईकवाडे, सदाशिव मैले यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कोपरगांव बेट भागातील भाविक, महिला, अबाल वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थीत होते.बिपीनदादा कोल्हे म्हणाले की, कोपरगांव ही भुमी संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असुन ऐतिहासिक वारसा आहे. गुरु शुक्राचार्य जगातील एकमेव मंदिर कोपरगांव बेट भागात आहे. महाशिवरात्रपूर्वकाळा निमीत्त येथे विविध धार्मिक कार्य पार पडतात. शुक्राचार्य हे भृगुऋषींचे पुत्र आहे. ते उत्तम संगीतज्ञ व कवी देखील होते. शिवआराधनेतून त्यांनी संजीवनी मंत्र विद्या येथेच आत्मसात करून अनेक मृतांना त्यांनी पुन्हा जीवदान दिल्याची तसेच कच देवयानी अख्यायिका येथे घडली आहे. १७० वर्षापूर्वीच्या शुक्राचार्य देवस्थानातील नित्य वापराच्या वस्तू, पौराणिक धार्मिक ग्रंथसंपदा, गुरु शुक्राचार्य वंशावळ आदि जतन करून त्याचे स्वतंत्र संग्रहालय याठिकाणी देवस्थानच्या वतीने उभारले असून या ऐतिहासिक वारसाचे महत्व भाविकापर्यंत पोहोचवले जात आहे, कचेश्वर, गुरू शुक्राचार्य, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी, जुनी गंगा देवी, यामुळे कोपरगाव बेट भागासह, ब्रम्हलीन संत रामदासी बाबा यांच्यामुळे तीर्थक्षेत्र कोकमठाण तर संवत्सर येथील विभांडक ऋषी, शृंगेश्वर आश्रम, चक्रधरस्वामी कार्यस्थळाचेही महत्व दिवसेंदिवस वाढत आहे असेही ते म्हणाले. शेवटी आदिनाथ ढाकणे यांनी आभार मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!