ना.थोरातांचा कोरोना नंतरही नातेवाईकांना मायेचा आधार
715 कोरोनाग्रस्तांच्या नातेवाईकांना 50 हजार सानुग्रह अनुदानाचा लाभ होणार
ना.थोरातांचा कोरोना नंतरही नातेवाईकांना मायेचा आधार
संगमनेर । विनोद जवरे ।
कोरोनाच्या संकटात सातत्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मदत करणारे राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी राज्य सरकारकडे सर्वप्रथम पाठपुरावा केला. हे अनुदान वारसांना मिळण्याकरता ऑनलाइन ची सुविधाही उपलब्ध करून दिली याचबरोबर ज्यांना अद्याप पर्यंत हे अनुदान मिळाले नाही अशांकरीता वैद्यकीय कॅम्पचे आयोजन करून 715 नातेवाईकांना मोठा दिलासा दिला आहे.संगमनेर येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयात इंद्रजित भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये अनुदान मिळण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे व वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश राख, डॉ. संदीप कचोरीया, महेश वाव्हळ , पुंजाहरी दिघे याचेसह वैद्यकीय विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.या शिबिरामध्ये अहमदनगर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील 715 कोरोना ने मृत व्यक्तींच्या नातेवाइकांनी ऑनलाइन फॉर्म भरून सहभाग नोंदवला. यापूर्वीही नामदार बाळासाहेब थोरात यांनी सानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला असून आपल्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात स्वतंत्र कक्ष निर्माण केला होता. त्या माध्यमातून अनेकांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदानाचा लाभ झाला .मात्र तरीही जे वंचित राहिले त्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आली असेल अशांसाठी वैद्यकीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते .यामुळे संगमनेर, राहाता, कोपरगाव, सिन्नर, पारनेर, जुन्नर ,राहुरी,अकोले या विविध तालुक्यातून अनेक रुग्णांचे नातेवाईक आले होते.या सर्वांचे आदरतिथ्य करून सर्वांना पाणी ,चहा, स्वतंत्र बसण्याची व्यवस्था व ऑनलाईन फॉर्म साठी सर्व सुविधा उपलब्ध करून देते सर्वांना मायेचा आधार दिला .यशोधन कार्यालय हे संगमनेर तालुक्यातील जनसामान्यांच्या मदतीचे केंद्र बनले आहेत. येथे कोरोना चे ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या निमित्ताने आलेल्या सर्व नातेवाईकांचे येथील कर्मचाऱ्यांनी केलेल्या आदरतिथ्य व प्रत्येकाला दिलेली सुविधा हे प्रत्येकाच्या मनाला भावणारे होते .या वेळी ग्रामीण भागातून आलेल्या विविध नागरिक ,महिला, वृद्ध नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, नामदार बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत सेवाभावी पद्धतीने आम्हा सर्वांची सेवा केली आहेत. मदतीला धावणारा हे सर्वसामान्यांचे नेतृत्व असून गरिबांसाठी सातत्याने काम करणारे नेते आहेत.तर अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक बु. येथील बाळासाहेब ढगे म्हणाले की, कोरोनामुळे अनेकांच्या जीवनामध्ये मोठे संकटाचे ढग आले. मात्र नामदार बाळासाहेब थोरात यांनी अशा संकटकाळात दिलेला मायेचा आधार हा प्रत्येकाच्या जीवनात कायम लक्षात राहणार आहे. अशा प्रकारची सेवा आणि सुविधा देणारे नामदार थोरात हे राज्यातील एकमेव नेते असल्याचेही ते म्हणाले… या सुविधांबद्दल सर्व नागरिकांनी इंद्रजीत भाऊ थोरात व यशोधन कार्यालयाचे आभार मानले.