ब्रेकिंग

आ. आशुतोष काळेंचा ग्रामीण जनतेला दिलासा १२ गावातील १५ रोहित्रांसाठी (ट्रान्सफॉर्मर) ९७ लाख निधी मंजूर

पोहेगाव सबस्टेशन लवकरच शहा सबस्टेशनला जोडले जाणार

आ. आशुतोष काळेंचा ग्रामीण जनतेला दिलासा  गावातील ५ रोहित्रांसाठी (ट्रान्सफॉर्मर) ९७ लाख निधी मंजूर

जाहिरात मो -7756045359

पोहेगाव सबस्टेशन लवकरच शहा सबस्टेशनला जोडले जाणार

कोपरगांव । प्रतिनिधी ।   कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या ग्रामीण भागाचा वीजपुरवठा सुरळीत व अधिक सक्षमपणे करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून आमदार स्थानिक विकास कार्यक्रम योजने अंतर्गत मतदार संघातील १ गावांमधील नवीन ५ विद्युत रोहित्रांसाठी (ट्रान्सफॉर्मर) तब्बल ९७ लाख रुपयांच्या निधीस महायुती शासनाने मंजुरी दिली आहे.

कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरीकांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या विजेच्या अडचणी सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी आजवर केलेल्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात वीज रोहीत्रांचा प्रश्न सुटला आहे. ज्या शेतकऱ्यांना वीज रोहित्राची (ट्रान्सफॉर्मर) आवश्यकता होती त्यांना तातडीने वीज रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) उपलब्ध करून दिले. तसेच ज्या ठिकाणी वीज रोहित्राची क्षमता वाढविणे गरजेचे आहे त्या ठिकाणी अधिक क्षमतेचे वीज रोहित्र बसवून शेतकऱ्यांची वीज रोहीत्रांबाबत (ट्रान्सफॉर्मर) होणारी अडचण आमदार आशुतोष काळे यांनी दूर केल्यामुळे कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागाचा विजेचा प्रश्न बहुतांशी प्रमाणात निकाली निघाला आहे.तरीही जे जे शेतकरी किंवा मतदार संघातील गावांच्या मागण्यानुसार ज्या ठिकाणी वीज रोहित्र बसविणे आवश्यक आहे त्याठिकाणी वीज रोहीत्रासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार आशुतोष काळे सदैव तत्पर असतात. त्याच तत्परतेतून पुन्हा एकदा १२ गावातील नवीन १५ विद्युत रोहीत्रांसाठी (ट्रान्सफॉर्मर) ९७ लाख रुपये निधी मंजूर करण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यामुळे कोपरगाव मतदार संघातील अंजनापूरघारीजवळकेधोंडेवाडीपोहेगाव बुबहादरपूरमढी खु.रांजणगाव देशमुखलौकी या गावांकरिता प्रत्येकी ०१ तर चांदेकसारे, सोनेवाडी आणि डाऊच खुर्द गावासाठी या गावासाठी प्रत्येकी ०२ अशी एकूण १७ नवीन रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कमी दाबाने मिळणारी विजेची समस्या कायमची संपुष्टात येवून वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच शेती पंपांना सुरळीत वीज पुरवठा होवून शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होणार असून वीज उपकरणांचे नुकसान टळणार आहे. नवीन रोहीत्रामुळे घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून नवीन जोडण्या देणे शक्य होणार आहे. त्यामुळे महावितरणवरील ताण देखील कमी होवून ग्रामीण विकासाला अधिकची गती मिळण्यास मदत होणार असून त्याबद्दल कोपरगाव मतदार संघातील अंजनापूरघारीजवळकेधोंडेवाडीपोहेगाव बुबहादरपूरमढी खुर्दरांजणगाव देशमुखलौकी, चांदेकसारे,सोनेवाडी डाऊच खु.आदी गावातील नागरीकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

 

पोहेगाव सबस्टेशन लवकरच शहा सबस्टेशनला जोडले जाणा

१३२ के.व्ही.ए.च्या शहा सबस्टेशनला पोहेगाव सबस्टेशन जोडण्यासाठी येत असलेल्या अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे पोहेगाव सबस्टेशन लवकरच शहा सबस्टेशनला जोडले जावून या सर्व रोहीत्रांना अधिकचा वीज पुरवठा प्राप्त होणार आहे. त्याचा फायदा वीज ग्राहकांना अखंडीतपणे वीज पुरवठा होण्यास मदत होणार असून त्यामुळे वीज पुरवठ्याच्या अडचणी कायमच्या संपुष्टात येतील.- आमदार आशुतोष काळे.  

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!