ब्रेकिंग

हरीबाबा देवस्थान हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हरीबाबा देवस्थानची विधिवत पूजा

हरीबाबा देवस्थान हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

 

जाहिरात मो -7756045359

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हरीबाबा देवस्थानची विधिवत पूजा

संगमनेर । प्रतिनिधी । नाशिक पुणे महामार्गावरील बेल्हाळे शिवारात असलेले हरिबाबा देवस्थान हे पंचक्रोशीतील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची चांगली सुविधा व्हावी याकरता सातत्याने निधी देऊन हा परिसर सुशोभित केला आहे. यापुढील काळातही या देवस्थानच्या मदती करता काम केले जाईल आगामी काळात हे मोठे धार्मिक स्थळ ठरेल असा विश्वास मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला असून त्यांच्या हस्ते हरिबाबा देवस्थानची विधिवत पूजा करण्यात आली.

वेल्हाळे परिसरातील हरीबाबा देवस्थान येथे यात्रेनिमित्ताने हरीबाबांची विधिवत महापूजा करण्यात आली यावेळी भव्य मिरवणूक संपन्न झाली. या प्रसंगी अध्यक्ष गोविंद जेडगुले ,रमेश जेडगुले ,तुषार शिंदें ,राऊसाहेब गुळवे ,सपंत वामन ,सचिन गुळवे,माऊली वामन ,मंगेश कांडेकर ,विलास नवले , तानाजी शिरतार, योगेश जेडगुले ,सरपंच विष्णु आव्हाड ,गोरक सोनवणे ,सुनिल जाधव ,नवनाथ जाधव ,शुभम भारसाखळ,सुधीर नवले ,अमोल सोनवणे, वैभव आरोटे ,प्रकाश सोनवणे, वाल्मिक शिरतार, दत्ता पवार,राजेंद्र कांडेकर आदी  उपस्थित होते

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की नाशिक पुणे महामार्ग लगत असलेले हे देवस्थान वेल्हाळे ,मालदाड, घुलेवाडी , सायखिंडी, क-रे, चिकणी यांसह विविध गावांमधील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे दरवर्षी या ठिकाणी यात्रेनिमित्त आणि हजारो भावी घेत असतात. हरी बाबाची यात्रा ही या परिसरातील भव्य दिव्य यात्रा असून भाविकांच्या सुविधांसाठी आपण सातत्याने निधी देऊन या परिसराचे सुशोभीकरण केले आहे.संगमनेर तालुक्यातील विविध देवस्थानच्या कामासाठी आपण सातत्याने मदत केली असून हे सर्व देवस्थाने मोठे धार्मिक स्थळ ठरले आहे .सर्व जाती धर्माचे समाजाचे लोक एकत्र येऊन ही यात्रा मोठ्या आनंदाने साजरा करत असून हा आनंदोत्सव लक्षात राहणारा असल्याचे ते म्हणाले.तर देवस्थानचे अध्यक्ष रमेश जेडगुले म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांनी पाठपुरावा करून या देवस्थानला तीर्थक्षेत्राचा क दर्जा मिळून दिला. विविध कामांसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मोठी मदत केली आहे या उलट सध्या संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीने कोणतीही मदत केली नाही फक्त या कामाची मागणी केली आहे. त्यामुळे अशा धार्मिक कामाचे त्यांनी श्रेय घेऊ नये असा टोलाही त्यांनी लगावला प्रसंगी भव्य मिरवणूक काढून महापूजा वाढती संपन्न झाली. यावेळी परिसरातील नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .फटाक्यांची आतिषबाजी हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!