शिर्डी शहरात वेश्या व्यवसायावर शिर्डी पोलीसांची धडक कारवाई

शिर्डी शहरात वेश्या व्यवसायावर शिर्डी पोलीसांची धडक कारवाई

शिर्डी । प्रतिनिधी । दि.11/02/2026 रोजी रात्री आम्हास गोपनीय बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, शिर्डी पोलीस ठाणेचे हद्दीत रिंगरोड, शिवाजीनगर, शिर्डी ता. राहाता येथे हॉटेल पवनधाम मध्ये एक महीला व एक इसम महीलांकरवी कुंटणखाना (वेश्याव्यवसाय) चालवित आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने आम्ही पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, सहा. पोलीस निरीक्षक महेश येसेकर, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पो.हे. का/1932 इरफान शेख, पो.हे.का 792 अशोक रामा शिंदे, पोहेकों संदिप उदावंत, पोहेका दातीर, पोना शेकडे, पोहेका संतोष गोमसाळे, मपोका सुनिता पवार असे अधिकारी व अंलदार यांना बातमीबाबत माहीती देवुन कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरुन वर नमुद पथकाने रिंगरोड, शिवाजीनगर, शिर्डी ता. राहाता येथे हॉटेल पवनधाम येथे दि.11/02/226 रोजी रात्री 20/40 वा सुमारास पंच व बनावट ग्राहकासह जावुन छापा टाकला असता तेथे हॉटेल पवनधामच्या पहील्या मजल्यावर एक पिडीत महीला व एक अल्पवयीन मुलगी मिळुन आली त्यांची तात्काळ सुटका करण्यात आली. तसेच इसम नामे-1) गोविंद लिलाराम गरुड वय 54 वर्षे रा. शिवाजीनगर, शिर्डी ता. राहाता (हॉटेल पवनधामचे मालक), महीला नामे 2) लता गुलाब चव्हाण वय 35 वर्षे रा. गणेशवाडी शिर्डी ता. राहाता (एजंट) यांनी पिडीत महिला व अल्पवयीन मुलगी यांना पुरुष ग्राहकाबरोबर शरीरसंबंध करण्याकरीता हॉटेल पवनधाम उपलब्ध करुन देऊन कुंटणखाना (वेश्याव्यवसाय) चालवुन त्यावर आपली उपजिविका करतांना मुद्देमालासह मिळुन आले. म्हणुन हॉटेल मालक व एजंटाविरुद्ध अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) 1956 चे कलम 3, 4, 5,7, 8 सह बालकाचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 12,17 प्रमाणे शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल मालक व एजंट महीला यांना अटक करण्यात आली असुन त्यांना आज रोजी मा. कोर्टात हजर करीत आहोत.

सदरची छापा कारवाई श्री. सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री. सोमनाथ वाघचौरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग व आमचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक श्री. रणजीत गलांडे, सहा. पोलीस निरीक्षक महेश येसेकर, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पो. हे. का/1932 इरफान शेख, पो.ना.792 अशोक रामा शिंदे, पोहेकाँ संदिप उदावंत, पोहेका दातीर, पोना शेकडे, पोहेका संतोष गोमसाळे , मपोका सुनिता पवार यांनी केलेली आहे.



