ब्रेकिंग

महाशिवरात्री निमित्त मानवतेच्या कल्याणासाठी प्रार्थना – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

महाशिवरात्री निमित्त संगमनेर तालुक्यात विविध देवस्थानांमध्ये भाविकांची मोठी गर्दी

जाहिरात मो -7756045359

महाशिवरात्री निमित्त मानवतेच्या कल्याणासाठी प्रार्थना – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

जाहिरात मो -7756045359

महाशिवरात्री निमित्त संगमनेर तालुक्यात विविध देवस्थानांमध्ये भाविकांची मोठी गर्दी

संगमनेर । प्रतिनिधी । आपण सरकारच्या माध्यमातून खांडगाव परिसर व मंदिर सुशोभीकरण व सुविधांसाठी सातत्याने मोठा निधी दिला. याचबरोबर ग्रामस्थांनी ही चांगली साथ दिली. त्यामुळे अत्यंत चांगल्या सुविधा दिल्याने खांडगाव हे धार्मिक पर्यटनासाठी मोठे तीर्थस्थळ ठरले असल्याचे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले असून समस्त मानव जातीच्या कल्याणाकरिता त्यांनी शंभू महादेवाकडे प्रार्थना केली.

खांडगाव येथील खांडेश्वर मंदिरात लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी विधिवत पूजा केली. यावेळी समवेत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहानु भाऊ गुंजाळ, ॲड.मधुकर गुंजाळ, दूध संघाचे संचालक रमेश गुंजाळ,  स्वामी दयानंद गिरी महाराज, सौ.अर्चनाताई बालोडे, कमलताई अरगडे, रावसाहेब गुंजाळ,अशोक गुंजाळ सर, कैलास गोसावी, वसंत गुंजाळ, बाळासाहेब गुंजाळ, लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन संजय गुंजाळ, सोसायटीचे चेअरमन संदीप गुंजाळ, कफारेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रवीण गुंजाळ, भीमराज गुंजाळ, रामनाथ गुंजाळ,बाजीराव गुंजाळ,श्रीरंग गुंजाळ, पांडुरंग गुंजाळ, दादासाहेब रूपवते, नारायण गुंजाळ,कपिल गुंजाळ, बाळासाहेब गुंजाळ, महेश गुंजाळ व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कपारेश्वर येथेही दर्शन घेऊन जनतेला शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाशिवरात्री हा हिंदू धर्मामध्ये शिवभक्तीचा अत्यंत पवित्र दिवस आहे. देशामध्ये मोठ्या उत्साहाने हा सण साजरा होतो. शंकराची पूजा भक्ती भावाने केली जाते. एक प्रसन्न वातावरण आणि आनंदाचे पर्व हे असते. खांडगाव येथील खांडेश्वर मंदिर त्याच प्रमाणे कपारेश्वर मंदिराच्या विकासासाठी आपण सातत्याने निधी दिला. याचबरोबर गावकऱ्यांनी ही मोठा सहभाग घेत या ठिकाणी अत्यंत सुंदर परिसर हा निर्माण केला. खांडगाव हे धार्मिक पर्यटनाचे केंद्र ठरले आहे. याचबरोबर गोरगरीब नागरिकांच्या मुला मुलींच्या विवाहासाठी अत्यंत चांगली सुविधा या ठिकाणी निर्माण झाली आहे सुशोभीकरणामुळे हा परिसर प्रसन्न व शांत असून अनेक भाविकांची सातत्याने येथे मोठी वर्दळ असते. शिवरात्रीच्या सणानिमित्त राज्यातील जनता,शेतकरी व सर्वसामान्य माणूस व समस्त मानवतेच्या कल्याणासाठी प्रार्थना त्यांनी केली.

तर लहान भाऊ गुंजाळ म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांची खांडेश्वर महादेवावर मोठी श्रद्धा आहे त्यांनी सातत्याने खांडेश्वर आणि कपालेश्वरच्या विकासासाठी निधी दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसराचा विकास झाले असल्याचे ते म्हणाले. यावेळी देवस्थानच्या वतीने लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करण्यात आला.याचबरोबर जवळे बाळेश्वर येथील बाळेश्वर, धांदरफळ बुद्रुक येथील रामेश्वर, कोकणगाव येथील निजरणेश्वर, निमगाव जाळी येथील दूधेश्वर, काशी विश्वेश्वर यांसह गावागावांमधील महादेव मंदिरांमधून भाविकांनी मोठी गर्दी केली. अत्यंत मोठ्या उत्साहात संगमनेर तालुक्यात सर्वत्र शिवजयंती साजरी करण्यात आली. भाविक भक्तांच्या वतीने अनेक ठिकाणी फराळाचे वाटप करण्यात आले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!