अहिल्यानगर शहरात दरोड्याच्या तयारीत असलेलेल्या चार जणांना अटक
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

अहिल्यानगर शहरात दरोड्याच्या तयारीत असलेलेल्या चार जणांना अटक


अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी
अहिल्यानगर । प्रतिनिधी । श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील दरोडा, घरफोडी व रोड रॉबरी गुन्हयाचे अनुषंगाने वेळोवेळी पेट्रोलिंग करुन, गुन्हे रोखण्याबाबत आदेश दिलेले आहेत.

सदर आदेशानुसार श्री किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना दिनांक २१/०२/२०२६ रोजी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मध्याप्रदेश मधील एक टोळी नगर शहरामध्ये दरोडा टाकण्यासाठी विनानंबरच्या स्कॉर्पिओ गाडी मधुन आगडगावाकडुन बुऱ्हानगर कडे येणार अशी खात्रीशिर बातमी मिळाली. नमुद बातमीच्या अनुषंगाने तात्काळ सपोनि / हरिश भोये, पोउपनि संदिप मुरकुटे, पोहेकॉ सुनिल पवार, पोहेकॉ गणेश धोत्रे, पोहेकों / शाहिद शेख, पोहेकॉ दिपक घाटकर, पोहेकॉ सुरेश माळी, पोकों/ आकाश काळे, चापोहेकॉ/भगवान धुळे, चापोहेकॉ अर्जुन बडे यांचे पथक तयार करुन सदर पथकास मिळालेल्या बातमीनुसार माहितीप्रमाणे कारवाई करणेकामी सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केलेले होते. तसेच नमुद पथकाचे मदतीकरीता पोहेकों / अरविंद भिंगारदिवे, नेम. पाथर्डी पो. ठाणे आणि पोकों/ शिवाजी कावडे, नेम. पोलीस मुख्यालय, अहिल्यानगर यांनाही पाठविण्यात आले.

वरील पथक दिनांक २१/०२/२०२६ रोजी पथकास गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने तात्काळ बुऱ्हानगर ते आगडगांव रोडवर दोन पंचासह सापळारचुन एक पांढऱ्या रंगाची विना नंबरची स्कॉर्पिओ दिसतांक्षणी तात्काळ सर्व रोडवर येवुन आडवली, नमुद गाडी रस्त्यावर थांबली व त्यातील एकुण ०६ इसम खाली उतरुन तात्काळ डोंगराकडे व जंगलाकडे पळुन जावु लागले असता, नमुद पथकाने पाठलाग करुन, ०४ इसम ताब्यात घेण्यात आले, ०२ इसमांचा शोध घेतला मात्र ते मिळुन आले नाही. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे त्यांचे नांव व पत्ते विचारला असता, त्यांनी त्यांचे नाव १) सादिकखान इसाकखान, वय ३७ वर्षे, रा. भोपाखेडा, धुपाडा, ता. मोहनबडोदिया, जि. सहाजापुर, राज्य-मध्यप्रदेश २) देवसिंग बाबुलाल भिलालाल, वय २४ वर्षे, रा. भोपाखेडा, धुपाडा, ता. मोहनबडोदिया, जि. सहाजापुर, राज्य-मध्यप्रदेश ३) दानीश सादिक शेख, वय-२४ वर्षे, रा. कापुरवाडी, ता. जि. अहिल्यानगर ४) दानीश अजीज शेख, वय-२४ वर्षे, रा. कापुरवाडी, ता. जि. अहिल्यानगर असलेबाबत सांगितले, तसेच देवसिंग भिलालाल यांस पळुन केलेल्या इसमाची नांवे व पत्ता विचारला असता त्यांने पळुन गेलेल्या इसमांची नांवे ५) राजाराम फुलेरिय, रा. सदगाव,अनुषंगाने तात्काळ बुऱ्हानगर ते आगडगांव रोडवर दोन पंचासह सापळारचुन एक पांढऱ्या रंगाची विना नंबरची स्कॉर्पिओ दिसतांक्षणी तात्काळ सर्व रोडवर येवुन आडवली. नमुद गाडी रस्त्यावर थांबली व त्यातील एकुण ०६ इसम खाली उतरुन तात्काळ डोंगराकडे व जंगलाकडे पळुन जावु लागले असता, नमुद पथकाने पाठलाग करुन, ०४ इसम ताब्यात घेण्यात आले, ०२ इसमांचा शोध घेतला मात्र ते मिळुन आले नाही. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे त्यांचे नांव व पत्ते विचारला असता, त्यांनी त्यांचे नाव १) सादिकखान इसाकखान, वय ३७ वर्षे, रा. भोपाखेडा, धुपाडा, ता. मोहनबडोदिया, जि. सहाजापुर, राज्य-मध्यप्रदेश २) देवसिंग बाबुलाल भिलालाल, वय २४ वर्षे, रा. भोपाखेडा, धुपाडा, ता. मोहनबडोदिया, जि. सहाजापुर, राज्य-मध्यप्रदेश ३) दानीश सादिक शेख, वय-२४ वर्षे, रा. कापुरवाडी, ता. जि. अहिल्यानगर ४) दानीश अजीज शेख, वय-२४ वर्षे, रा. कापुरवाडी, ता. जि. अहिल्यानगर असलेबाबत सांगितले, तसेच देवसिंग भिलालाल यांस पळुन केलेल्या इसमाची नांवे व पत्ता विचारला असता त्यांने पळुन गेलेल्या इसमांची नांवे ५) राजाराम फुलेरिय, रा. सदगाव,ता.जि.सहजापुर, राज्य-मध्यप्रदेश (फरार) ६) राजेश परमार, रा. कचोर, ता. मोहनबडोदिया, जि. सहजापुर, राज्य-मध्यप्रदेश (फरार) असे असल्याचे सांगितले. नमुद इसमांची पंचासमक्ष अंगझडती व गाडीची झडती घेतली असता, त्यांचे कब्जात खालील प्रमाणे मुद्देमाल मिळुन आला आहे. रु. ३५,०००/- किंमतीचा ०१ गावठी कट्टा व ०१ जिवंत काडतुस सादिकखान इसाकखान यांचे कमरेला मिळुन आले, रु.५००/- किंमतीचा लाकडीमुठ असलेली धारदार कुकरी, एक लोखंडी कटावणी, चारचाकी वाहनाचे टायर खोलण्याचा पान्हा, एक लोखंडी टॉमी, कॅरीबॅग मध्ये लाल रंगाची मिरची पावडर, छोटी बॅटरी, सात फुट लांबीचा बांगडीपाईप, आरोपीकडील विविध कंपन्याचे जु. वापरते ०५ मोबाईल फोन रु. ४०,०००/- किंमतीचे मोबाईल, ३५ लिटर क्षमतेचे २३ ड्रममध्ये गाडीच्या मागील हौद्यामध्ये ८०५ लिटर रु. ८०,५००/- किंमतीचे डिझेल आणि रु. ५,००,०००/- किंमतीची विना नंबरची पाढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ गाडी, असा एकुण रु. ६,५६,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.वर नमूद ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह भिंगार कॅम्प पो. ठाणे येथे हजर करुन, यांचेविरुध्द विरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ८७/२०२६, दिनांक २१/०२/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१०(४), ३१० (५) सह आर्म अॅक्ट ३/२५, ४/२५ प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास भिंगार कैम्प पो. ठाणे हे करीत आहेत. सदर आरोपीकडून इतर डिझेल चोरी व माला विरुध्दचे उघडकीस येण्याची शक्यता आहे.सदरची कामगिरी मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.



