ब्रेकिंग

मिरजगाव  येथे स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा दणका ! 25,43,000/- किंमतीचा मुद्देमालासह दोन आरोपींना  बेड्या

जाहिरात मो -7756045359

मिरजगाव  येथे स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा दणका ! 25,43,000/- किंमतीचा मुद्देमालासह दोन आरोपींना  बेड्या

मिरजगाव । प्रतिनिधी । अहिल्यानगर जिल्हा घटकामध्ये मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे.

सदर आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नोडल अधिकारी तथा पो.नि. श्री किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणारे इसमांची माहिती काढून कारवाई करणेबाबत पोउपनि/समीर अभंग पोलीस अंमलदार, हृदय घोडके, संतोष खैरे, दिपक घाटकर, लक्ष्मण खोकले, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भिमराज खसे, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड मनोज साखरे, चालक अरुण मोरे, उमाकांत गावडे यांना रवाना केले.

सदर पथक हे मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थबाबत माहिती घेत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत स्कॉपीओ गाडी क्रमांक एम. एच. १४ जी. एच. २३३० ही मधुन दोन इसम अंमली पदार्थ गांजा विक्रीकरीता कर्जत येथुन पाथर्डीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. सदरची बातमी मा. पोनि श्री कबाडी सो, यांना कळविले असता त्यांनी मिरजगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने तात्काळ मिरजगाव पोलीस स्टेशन येथे जावुन सपोनि/विजय झंजाड यांना मिळालेल्या बातमीचा लेखी रिपोर्ट दिला असता त्यानुसार सपोनि/विजय झंजाड यांचेसह कारवाई करण्याकरीता आवश्यक त्या साहित्यासह पोलीस स्टेशन मधुन सरकारी वाहनाने निघुन मिरजगाव ते कर्जत जाणारे रोडवरील ब्रिजखाली महात्मा फुले चौक येथे जावुन सापळा रचुन थांबले असतांना बातमीतील नमुद स्कॉर्पीओ गाडी येतांना दिसली तेव्हा बातमीतील हकिगतीप्रमाणे खात्री झाल्याने पथकाने स्कॉर्पीओ गाडी थांबवून गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये दोन इसम बसलेले दिसुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव पत्ता विचारले असतांना त्यांनी त्यांचे नांवे १) गणेश अंकुश कराड वय ३२ वर्षे रा. आगसखांड, ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर, २) सुखदेव शिवनाथ कदम वय-३० वर्षे रा. सदर असे असल्याचे सांगितले. तेव्हा सपोनि विजय झंजाड यांनी बातमीची हकिगत सांगुन त्यांचे व स्कॉर्पीओ गाडीची झडती घेतली असता गाडीचे डिक्कीमध्ये ०४ गोण्या मिळुन आले. नमुद इसमांना गोण्या बाबत विचारपुस करता त्याने त्यामध्ये अंमली पदार्थ गांजा असल्याचे सांगितले आहे.ताब्यातील आरोपीतांचे ताब्यातुन १८,१८,०००/-रु कि.चा १३२.८४ किलो ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, २५,०००/-रु कि.चे दोन मोबाईल, ७,००,०००/-रु कि.चा एक स्कॉर्पीओ चारचाकी वाहन असा एकुण २५,४३,०००/-रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ/८०० भाऊसाहेब राजु काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मिरजगाव पोलीस स्टेशन गु. र. नं. ६०/२०२६ गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन १९८५ चे कलम ८ (क), २० (ब)ii (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास मिरजगाव पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानागर व मा. श्री प्रविणचंद लोखंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर व मिरजगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!