ब्रेकिंग

गणितातील पाय या संकल्पनेचा ब-याच विज्ञान विषयात उपयोग करता येतो – प्रसिद्ध वैज्ञानिक लेखक डॉ. निवास पाटील

गणितातील पाय या संकल्पनेचा ब-याच विज्ञान विषयात उपयोग करता येतो – प्रसिद्ध वैज्ञानिक लेखक डॉ. निवास पाटील
संगमनेर । प्रतिनिधी । दैनंदिन जीवन जगत असताना गणित हे नेहमी मनुष्याच्या उपयोगी येत असते. विविध समस्या सोडवण्यासाठी गणितातील अनेक सूत्रे व संकल्पना उपयोगी येत असतात. गणितातील पाय या संकल्पनेचा बऱ्याच विज्ञान विषयात उपयोग करता येतो असे प्रतिपादन प्रसिद्ध वैज्ञानिक लेखक डॉ. निवास पाटील यांनी केले आहे.
जाहिरात – 7756045359

नांदुरी दुमाला येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालय व नामदार बाळासाहेब थोरात ज्युनिअर कॉलेज नांदुरी दुमाला येथे आंतरराष्ट्रीय पाय दिनानिमित्त प्रसिद्ध वैज्ञानिक लेखक डॉ निवास पाटील बोलत होते.


        नांदुरी दुमाला येथील  सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालय व लोकनेते  नामदार बाळासाहेब थोरात ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय पाय दिनानिमित्त प्रसिद्ध वैज्ञानिक लेखक डॉ निवास पाटील यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राजहंस दूध संघाचे संचालक  विलास कवडे, विद्यासागर शिक्षण संस्थेचे सचिव सचिन मालेगावकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष  शांताराम डोंगरे,  विद्यालयाचे प्राचार्य  बी.व्ही. वामन सर,  देशमुख सर,  गुंजाळ सर , उपरे सर, शिंदे सर,  पावसे सर ,  शिंदे  सर,  शिरोळे सर , रोहम मॅडम ज्युनिअर कॉलेजचे  राऊत सर,  सय्यद सर, श्रीमती कवडे मॅडम, श्रीमती गोरडे मॅडम, श्रीमती गायखे  मॅडम ,तसेच   सुनील कवडे,  निलेश गाडांळ,  अरुण कवडे, शिक्षकेत्तर सेवक वृंद, आणि विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी इ.9 वी व इ.10 वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ निवास पाटील म्हणाले, मानवी जीवन हे विविध घटनांनी प्रभावित होत असून, सुखद आणि दुःखद घटना मानवी जीवनाला अर्थ प्राप्त करून देतात .संख्याशास्त्रातील नियम आणि संबोधातून विविध अर्थ विद्यार्थ्यांना उलगडून दाखविले. विविध काळात संख्याशास्त्र संशोधकांनी संशोधनाअंती वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म सांगून पायची किंमत मांडणी केली आहे. आजच्या दिवसाचे महत्त्व गणिताच्या जगतात  22 जुलै हा पाय दिन म्हणून मानला जातो. प्राचीन काळापासून पाय या संख्येचे विविधांगी शास्त्रज्ञ संशोधक आणि गणिती तज्ञ यांच्या संशोधनातून आपणास ज्ञान उमगते , गणितातील वास्तव संख्येचे दोन घटक परिमेय व अपरिमेय संख्या संख्या असतात त्यापैकी पाय ही अपरिमेय संख्या असून त्याच्या विविध शास्त्रज्ञांनी घेतलेल्या वेगवेगळ्या किमती तसेच समीकरण सोडवणे व बैजिक राशी ला सोपे रूप देणे याविषयीची माहिती दिली. विविध ग्रहांवरील माणसांची वजन आणि उंची ही माहिती देखील  सांगितली. आर्यभट्ट, भास्कराचार्य, आर्किमिडीज ,श्रीनिवास रामानुजन या संशोधकांची विविध संबोधासंबंधी माहिती विशद करून सांगितली. प्रसिद्ध वैज्ञानिक लेखक डॉ निवास पाटील यांच्या हस्ते विद्यालयास अकरा पुस्तकांची ग्रंथ भेट देण्यात आली.याप्रसंगी राजहंस दूध संघाचे संचालक  विलास कवडे, विद्यासागर शिक्षण संस्थेचे सचिव  सचिन मालेगावकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शांताराम डोंगरे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपरे सर यांनी तर , देशमुख सर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. 
       
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!