संत गाडगे महाराज जयंती – स्मार्ट ग्राम डाऊच बुद्रुक येथे वृक्षारोपण व महाश्रमदानाने साजरी !
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सन 2025/26 अंतर्गत

संत गाडगे महाराज जयंती – स्मार्ट ग्राम डाऊच बुद्रुक येथे वृक्षारोपण व महाश्रमदानाने साजरी !


मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सन 2025/26 अंतर्गत
कोपरगाव । प्रतिनिधी । आज दिनांक 23/02/2026 सोमवार रोजी के. जे. सोमय्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील भूगोल विभाग अंतर्गत ग्राम सर्वेक्षण प्रकल्प तसेच संत गाडगेबाबा जयंती निमित्त ग्राम स्वच्छता व वृक्ष लागवड या उपक्रमाचे आयोजन कोपरगाव तालुक्यातील स्मार्ट ग्राम डाऊच बुद्रुक गावात करण्यात आले.

गाव सर्वेक्षण व गृहभेटी दरम्यान भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांनी मौजे बुद्रुक बु. गावातील प्रत्येक घरोघर जाऊन सर्वे करण्यात आला. सर्वे करताना शासनाच्या विविध योजना राबवून गावात करण्यात आलेल्या विकासाच्या योजना व भविष्यात कुटुंबांना कोणत्या योजना किंवा गरजांची आवश्यकता आहे,

याचा परिपूर्ण अभ्यास करून सर्वे केला आजच्या वृक्षारोपण व श्रमदान कार्यक्रमासाठी डाऊच बु. गावचे प्रथम नागरिक तथा लोकनियुक्त सरपंच दिनेश भाऊ गायकवाड , डाऊच बुद्रुक गावचे ग्रामविकास अधिकारी विजयसिंह पाटील, तसेच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे, जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य व आपल्या गावचे खंबीर नेतृत्व भिवराव नाना दहे के. जे.सोमय्या महाविद्यालयातील भूगोल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चव्हाण , सहाय्यक प्राध्यापक डॉ. साळुंके सर, प्रा. सोनवणे सर, प्रा. खंडिझोड मॅडम, प्रा. संपत माळी, प्रा. जाधव मॅडम तसेच भूगोल विभागातील वरिष्ठ महाविद्यालयाच्या एकूण 31 विद्यार्थ्यांनी गांव सर्वेक्षण व ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग घेतला



