ब्रेकिंग

सोन्याची मोहनमाळ चोरणा-या महिलांना कोतवाली पोलीसांनी  केले जेरबंद

चोरलेली मोहनमाळ केली हस्तगत ; कोतवाली पोलिसांची दमदार कामगिरी

सोन्याची मोहनमाळ चोरणा-या महिलांना कोतवाली पोलीसांनी  केले जेरबंद

जाहिरात मो -7756045359

चोरलेली मोहनमाळ केली हस्तगत ; कोतवाली पोलिसांची दमदार कामगिरी

अहिल्यानगर । प्रतिनिधी । फिर्यादी ताराबाई महादेव शेलार वय 65 वर्षे रा. पळवे खुर्द ता. पारनेर जि. अहिल्यानगर हया दि. 23/02/2026 रोजी 11:30 वाचे सुमारास केडगाव अहिल्यानगर येथुन मुळगावी एसटी बसने प्रवासाकरीता निघाल्या असता केडगाव बस स्टॉप येथे एस टी. बस मध्ये घडत असताना गर्दा मध्ये एक अनोळखी महोला ढकलाढकल करत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांचे बंगेच्या कप्यात ठेवलेली अडीच तोळे वजनाची सोन्याची मोहन माळची पाहणी केली असता बॅगेत सोन्याची मोहनमाळ नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केल्याने एस.टी बस चालकाने बस केडगाव चौकी, कोतवाली पोलीस ठाणे अहिल्यानगर येथे घेवून जावून पोलीसांना घटनेची माहीती दिली. त्यानंतर तात्काळ गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी बसममधील संबधीत संशयित महिलेकडे चौकशी करुन आणखी चार महिला निष्पन्न करुन सदरचे घटणे संबधीत 05 महिलांना ताब्यात घेवून त्यांनाविश्वासात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांचेकडुन चोरीस गेलेले एकुण 3,00,000/- रुपये किमतीची अडीचे तोळे वजनाची मोहनमाळ ही हस्तगत केली आहे. सदर प्रकाराबाबत कोतवाली पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 149/2026 बीएनएस 2023 चे कलम 305 (क), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयाचा पुढील तपास मपोकों/1460 रोहिणी दरंदले या करीत आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री. सोमनाथ घार्गे सो. अपर पोलीस अधिक्षक श्री. वैभव कलुबर्म, सो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. डॉ. दिलीप टिपरसे सो. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. संभाजी गायकवाड, पोसई प्रविन पाटील, सफो संतोष बनकर, पोहेको दाँड, पोहेकों/ साबीर शेख, मपोहेकों रोहिणी दरंदले, पोहेकों/ विशाल दळवी, पोहेकों/ वाकचौरे, पोहेकों राहुल शींद, पोकों दिपक रोहकले, सत्यम शिंदे, अमोल गाढे सुरज कदम, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, अतुल काजळे, महेश पवार, रमेश शिंदे, अतुल लाटे, मपोकों/ पल्लवी रोहकले दक्षीण मोबाईल सेलचे पोकों/ राहुल गुंड यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!