ब्रेकिंग

अर्थसंकल्प पूर्णपणे अवास्तव असून उत्पन्न आणि खर्चाचा योग्य मेळ घालून शहर हिताचे निर्णय घ्यावे – नगरसेवक जनार्दन कदम

जाहिरात मो -7756045359
अर्थसंकल्प पूर्णपणे अवास्तव असून उत्पन्न आणि खर्चाचा योग्य मेळ घालून शहर हिताचे निर्णय घ्यावे – नगरसेवक जनार्दन कदम

कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव नगरपरिषदेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये उत्पन्न आणि खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणवर तफावत असून हा अर्थ संकल्प पूर्णपणे अवास्तव आहे. उत्पन्न आणि खर्चाचा योग्य मेळ घालून शहर हिताचे निर्णय घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक जनार्धन कदम यांनी सभे दरम्यान केली.

कोपरगाव नगरपरिषद सभागृह येथे गुरुवारी दि.२६रोजी सकाळी ११ वाजता २०२६-२०२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात नगरपरिषदेचे वार्षिक उत्पन्न आणि सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मोठी तफावत असल्याचे नगरसेवक जनार्दन कदम यांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिले.नगरपरिषदेला मालमत्ता कर, पाणीपट्टी, जागाभाडे आणि गाळेभाडे हे मुख्य उत्पन्नाचा श्रोत आहे. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पामध्ये एकूण कर आकारणी ९.५ कोटींची दाखवली असली तरी मागीलवर्षी प्रत्यक्ष वसुली फक्त ४ कोटींची झाली आहे. यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा अजिबात ताळमेळ लागत नाही. अशा परिस्थितीत अवास्तव कामांच्या तरतुदी करून अर्थसंकल्प मांडणे म्हणजे कोपरगावकरांना उघड उघड फसवणे आहे. कोपरगावकरांना उन्हाळ्यात नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी पाटबंधारे विभागाची थकबाकी भरण्याबाबत तरतूद करणे आवश्यक असतांना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही अर्थसंकल्प कोलमडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. नगरपरिषदेवर मागील वर्षापर्यंत जवळपास १२ कोटी रुपयांची देणी प्रलंबित आहे. मागील वर्षी किती निधी खर्च झाला आणि शिल्लक किती आहे याची सविस्तर माहिती सभागृहाला देण्यात आली नसल्याने सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर शंखा निर्माण होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक जनार्धन कदम यांनी सांगितले. नगरपरिषदेचा शास्ती प्रस्ताव मंत्रालयात अंतिम टप्प्यात असतानाही त्याचे संभाव्य उत्पन्न अर्थसंकल्पात धरले आहे. शासनाकडून शास्तीची रक्कम नगरपरिषदेला प्राप्त झाली तर त्याची तरतूद अर्थसंकल्पात केलेली नाही. बहुमताच्या जोरावर पत्रकारांना प्रवेश न देणे आणि आम्ही बोलायला उठल्यावर बैठक आटोपती घेण्याचा प्रयत्न करणे आणि हे सत्ताधाऱ्यांच्या मनमानीचे लक्षण असल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!