ब्रेकिंग

संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने 5 ते 7 मार्च छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव

संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने 5 ते 7 मार्च छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव


संगमनेरकरांनो, कसं हवंय तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच स्मारक ?

नोंदवा आपले मत ;  नगरपालिकेच्या वतीने बस स्थानक येथे पार पडणार विशेष मतदान प्रक्रिया
संगमनेर । प्रतिनिधी । संगमनेर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य पूर्णाकृती स्मारक उभारण्याच्या दृष्टीने स्मारकाच्या स्वरूपाबाबत नागरिकांचे थेट मत जाणून घेण्यासाठी संगमनेर नगरपालिकेच्या वतीने दि.५ ते ७ मार्च दरम्यान विशेष मतदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. सौ.मैथिलीताई तांबे यांनी दिली आहे

या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना डॉ .सौ. मैथिलीताई तांबे म्हणाल्या की,या स्मारकासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजीत तांबे यांनी १८ डिसेंबर २०२३ रोजी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करून संगमनेर बस स्थानकासमोरील १५ x १५ मीटर जागा संगमनेर नगरपालिकेकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेने ही जागा संगमनेर नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आली.त्यामुळे शहराच्या प्रमुख ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य व प्रेरणादायी स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.दरम्यान, स्मारकाच्या स्वरूपाबाबत संगमनेर शहरातील शिवप्रेमी व नागरिकांनी विविध भावना व्यक्त केल्या आहेत. काही नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णाकृती उभे स्मारक असावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर काहींनी सिंहासनाधीश्वर स्वरूपातील स्मारक व्हावे असे मत नोंदविले आहे. तसेच अनेक शिवभक्तांनी अश्वारूढ स्वरूपातील स्मारक उभारण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या या सर्व भावना आणि सूचनांचा विचार करुन संगमनेर नगरपालिकेने लोकसहभागातून अंतिम निर्णय घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  त्यानुसार, ५, ६ आणि ७ मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत संगमनेर बस स्थानकावरील सुप्रीम पावभाजी समोर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पूर्णाकृती उभे स्मारक, पूर्णाकृती सिंहासनाधीश्वर स्मारक व पूर्णाकृती अशारूढ स्मारक ह्या तीनही स्मारकांचे संभाव्य 3D प्रतिमा नागरिकांसाठी ठेवण्यात येणार असून शहरातील नागरिकांना प्रत्यक्ष मतदानाद्वारे आपल्या पसंतीच्या स्मारकाची निवड करण्याची संधी दिली जाणार आहे.हा उपक्रम संगमनेर नगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असून स्मारक उभारणी प्रक्रियेत पारदर्शकता, लोकसहभाग आणि नागरिकांच्या भावनांचा सन्मान राखण्याचा हा प्रयत्न असल्याचे संगमनेर नगरपालिकेने स्पष्ट केले. शहराच्या अस्मितेशी निगडित असलेल्या या महत्त्वपूर्ण विषयात समस्त संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले अमूल्य मत द्यावे, असे आवाहन संगमनेर नगरपरिषद यांच्या वतीने करण्यात आले केले.

 

गुरुवार 5 मार्च रोजी शुभारंभ

गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वा. लोकनेते बाळासाहेब थोरात, मा आ डॉ सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉ मैथिलीताई तांबे यांच्यासह विविध मान्यवर व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ होणार आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!