ब्रेकिंग

अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे केंद्र म्हणून उदयास येणार – ना.विखे पाटील

अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे केंद्र म्हणून उदयास येणार – ना.विखे पाटील

अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे केंद्र म्हणून उदयास येणार – ना.विखे पाटील

लोणी । प्रतिनिधी ।क्षमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक येत आहे. औद्योगिक दृष्टीने जिल्ह्याला मुख्य केंद्र बनविण्याच्या उद्देशाने आवश्यक कार्यवाही निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

जिल्ह्यातील शिर्डी, राहुरी आणि श्रीगोंदा तालुक्यातील औद्योगिक वसाहतीच्या संदर्भात मंत्रालयात विशेष बैठकीचे आयैजन करण्यात आले होते.परिसरातही औद्योगिक विकासाला चालना मिळावी, यासाठी औद्योगिक क्षेत्राच्या उभारणी संदर्भातील सर्व अडचणी दूर करण्याबाबत प्रशासकीय स्तरावर तातडीने कार्यवाही करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.शिर्डी येथील औद्योगिक वसाहती बरोबरच राहुरी आणि श्रीगोंदा तालुक्यातील औद्योगिक वसाहतीच्या निर्मितीसाठी कार्यवाही करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे सूचित करून राहुरी तालुक्यात कृषी विद्यापीठाची जागा औद्यगिक विकासासाठी मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाटपुरावा सुरू असून,औद्योगिक वसाहतींमुळे अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात वाढत असलेल्या औद्योगिक गुंतवणूकीचा जिल्ह्याला मोठा लाभ होत असून, औद्योगिक विस्तार झाल्यास स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षाही बैठकीत यावेळी व्यक्त करण्यात आली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!