छत्रपती शिवाजी महाराजांचे बसस्थानकासमोर भव्य स्मारक करणार – आ.सत्यजीत तांबे
कसे हवे महाराजांचे भव्य स्मारक, नगरपालिकेच्या मत नोंदणी अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती शिवाजी महाराजांचे बसस्थानकासमोर भव्य स्मारक करणार – आ.सत्यजीत तांबे

कसे हवे महाराजांचे भव्य स्मारक, नगरपालिकेच्या मत नोंदणी अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संगमनेर बसस्थानक येथे संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने कसे असावे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक याबाबत नागरिकांची मत नोंदणी शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, संदीप शेठ साळुंखे, सोमेश्वर दिवटे,निखिल पापडेजा, नगरसेवक विश्वासराव मुर्तडक, सौरभ कासार, भारत बोराडे, नितीन अभंग,सौ.सीमा खटाटे, दिलीपराव पुंड, सौ.अर्चना दिघे, सौ.शोभाताई पवार,सौ.प्राची काशीद,किशोर पवार, डॉ.अनुराधा सातपुते,सौ.वनिता गाडे,गजेंद्र अभंग,सौ.दिपाली जीवन पांचारीया,गणेश गुंजाळ, अमजद पठाण, श्रीमती विजया गुंजाळ, अमर कतारी, सरोजना पगडाल, किशोर टोकसे, सौ.प्रियांका शहा, शैलेश कलंत्री, नंदा गरुडकर,मुजीब खान पठाण,डॉ.दानिश खान, शिवजयंती उत्सव समितीचे सतीश आहेर, संजयशेठ क्षत्रीय यांच्यासह संगमनेर मधील विविध पक्षांचे व विविध सेवाभावी संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, संगमनेर मधील हायटेक बसस्थानकासमोर मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्वप्रथम पाठपुरावा केला. तत्कालीन नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात 2018 मध्ये नगरपरिषदेने याबाबत पाठपुरावा केला. जे आता स्मारकाची मागणी करता ते त्या वेळेस कुठेच नव्हते. 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या कामाला गती दिली. 2023 मध्ये आपण तत्कालीन परिवहन मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महाराजांच्या स्मारकासाठी बसस्थानकावर राज्यात प्रथम जागा मंजूर करून घेतली. यासाठी निधी देण्याची घोषणा शासनाने केली. मात्र आता शासनाने निधी दिला तर आहेच नाही तर शासनाच्या मदतीशिवाय लोकवर्गणी, नगरपरिषद,आमदारनिधी, जिल्हा नियोजन समिती या माध्यमातून येत्या वर्षभरामध्ये भव्य स्मारक उभारणार आहोत.

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे राजे होते. 18 पगड जाती व बारा बलुतेदारांचे स्वराज्य त्यांनी निर्माण केले. महाराजांनी स्वतःचे महाल उभारले नाही परंतु गडकिल्ले हेच त्यांचे महाल आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाची अस्मिता आहे त्यांचे भव्य स्मारक संगमनेर मध्ये पूर्ण करणार आहोत.संगमनेर सेवा समितीला संगमनेर मधील नागरिकांनी भरभरून यश दिले आणि या सेवा समितीच्या सर्व नगरसेवकांनी पहिल्याच बैठकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सावित्रीबाई फुले,अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्याचा ठराव पारित केला. हे अत्यंत कौतुकास्पद आहे. महाराजांच्या स्मारकाबाबतही सर्व नागरिकांच्या मताचा आदर करून जनतेला जसे हवे आहे तसे भव्य स्मारक उभारण्यात येईल असे आमदार सत्यजित तांबे यांनी जाहीर करताच टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला.तर डॉ.मैथिलीताई तांबे म्हणाल्या की, संगमनेर हे शांत आणि सुसंस्कृत शहर आहे येथे महाराजांचे भव्य स्मारक करण्यासाठी नागरिकांना हे स्मारक कसे हवे याबाबत जाणून घेण्यात येणार आहे. याचबरोबर शहराच्या विकास कामांमध्ये नागरिकांचा सहभाग राहणार असल्याच्या त्या म्हणाल्या.यावेळी संगमनेर नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी,संगमनेर शहरातील विविध विभागाचे अधिकारी, आणि शहरातील नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मत नोंदणीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बस स्थानकासमोर अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, भव्य उभे महाराजांचे स्मारक आणि सिंहासनाधीश्वर महाराजांचे पूर्णाकृती स्मारक असे तीन पर्याय देण्यात आले असून सर्व नागरिकांनी आपले मत नोंदवा. ही नोंदणी तीन दिवस सुरू राहणार असून सर्वांनी आपले मत नोंदवावे.आपल्या सगळ्यांच्या मताचा आदर करून येत्या काळात भव्य स्मारक उभारण्यात येईल असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले असून पहिल्या दिवशी 6113 नागरिकांनी मत नोंदणी केली आहे.



