ब्रेकिंग

जवळके ग्रामस्थांच्या वतीने स्व.शंकरराव कोल्हे यांना अभिवादन करत प्रेरणा दिन साजरा

जवळके ग्रामस्थांच्या वतीने स्व.शंकरराव कोल्हे यांना अभिवादन करत प्रेरणा दिन साजरा
oplus_2
जाहिरात
जवळके ग्रामस्थांच्या वतीने स्व.शंकरराव कोल्हे यांना अभिवादन करत प्रेरणा दिन साजरा

कोपरगांव । प्रतिनिधी । सहकारमहर्षी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी नेहमी मानवसेवा हीच ईश्वरसेवा हा विचार ठेऊन काम केले. समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. कोपरगाव आणि परिसराचे नंदनवन होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत दूरदृष्टी जोपासली. त्यांच्याच या कार्याची प्रेरणा घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त सगळीकडे प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून त्याच अनुषंगाने तालुक्यातील जवळके ग्रामस्थांच्या वतीने मंगळवार दि २४ मार्च रोजी साहेबांना अभिवादन करत प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

oplus_2

या प्रसंगी जवळके ग्रामपंचायतचे माजी सरपंच बंडोपंत थोरात, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब थोरात तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश थोरात आदी सह जवळके गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित असलेल्या जवळके गावच्या ग्रामस्थांनी माजी मंत्री सहकाराचे जनक सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांच्या आठवणीना उजाळा देत त्यांनी कोपरगाव तालुक्यासह संबंध राज्यातील तळागाळातील सर्वच समाजासाठी केलेल्या महान कार्याची महती सांगत साहेबांना आदरांजली व्यक्त केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!