ब्रेकिंग

अंजनापुर आरोग्य शिबिरात २४० रुग्णाची तपासणी तर ॲम्बुलन्स लोकार्पण – बाळासाहेब गव्हाणे पाटील

अंजनापुर आरोग्य शिबिरात २४० रुग्णाची तपासणी तर ॲम्बुलन्स लोकार्पण – बाळासाहेब गव्हाणे पाटील

जाहिरात मो-7756045359
अंजनापुर आरोग्य शिबिरात २४० रुग्णाची तपासणी तर ॲम्बुलन्स लोकार्पण – बाळासाहेब गव्हाणे पाटील

कोपरगाव । प्रतिनिधी । नेहमीच सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे आरोग्यदूत म्हणून सर्वपरिचित अंजनापुर येथील दानशूर व्यक्तिमत्व बाळासाहेब गव्हाणे पाटील तसेच दत्तात्रय गोवर्धन गव्हाणे व रोहिदास साहेबराव गव्हाणे या मित्रमंडळाच्या वतीने अंजनापूर येथील हनुमान मंदिर प्रांगणात गुरुवार दि २ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत एस जे एस हॉस्पिटल व तुलसी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने हनुमान जयंती व अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने भव्य महाआरोग्य शिबिरात २४० हुन अधिकच्या रुग्णांनी घेतला लाभ.

आयोजित केलेल्या या महाआरोग्य तपासणी शिबिरात मेंदूच्या आजारावर, हृदयांच्या आजारावर, हाडांच्या आजारावर, दातांच्या आजारावर, डोळ्यांच्या आजारावर, जनरल सर्जरी, युरो सर्जरी, स्त्रियांचे आजार, बालकांचे आजार, कॅन्सर आदि आजारावर शिबिरात अनुभवी तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन सल्ला व उपचार करण्यात आले.तर या शिबिरात १६७ गरजू रूग्णांना मोफत चष्मा वाटप केले तसेच ३४ रुग्णांना आवश्यक त्या पुढील शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.तसेच याप्रसंगी आरोग्यदूत बाळासाहेब गव्हाणे पाटील यांच्यातर्फे अंजनापूर व पंचक्रोशीयांसाठी नवी कोरी ॲम्बुलन्स ह.भ.प एकनाथ महाराज चत्तर यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले आहेत ही ॲम्बुलन्स अंजनापुर व पंचक्रोशीतील सर्वांसाठी मोफत देण्यात येणार असल्याचे बाळासाहेब गव्हाणे यांनी सांगितले या प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व मित्र परीवार उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!