कर्मवीर शंकररावजी काळे यांची सोमवार (दि.०६) रोजी १०५ वी जयंती

कर्मवीर शंकररावजी काळे यांची सोमवार (दि.०६) रोजी १०५ वी जयंती

कर्मवीर शंकररावजी काळे यांची सोमवार (दि.०६) रोजी १०५ वी जयंती
कोपरगांव । प्रतिनिधी । माजी खासदार, सहकार चळवळीतील अग्रणी नेते आणि शिक्षणप्रेमी स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त सोमवार (दि.०६) रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सकाळी ९.०० वाजता पंचायत समिती, कोपरगाव येथे व त्यानंतर सकाळी ०९.३० वा. कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर शंकरराव काळे स्मृती-उद्यान, गौतमनगर येथे पुष्पांजली कार्यक्रम होणार असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन यांनी दिली आहे.या जयंती सोहळ्यास माजी आमदार अशोकराव काळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ.पुष्पाताई काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे, तसेच कारखान्याचे व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, मित्र मंडळाचे सदस्य व उदयोग समूहाच्या विविध संलग्न संस्थांचे चेअरमन,व्हा.चेअरमन,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांनी सहकार, शिक्षण, कृषी व सिंचन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या उन्नतीसाठी त्यांनी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आर्थिक बळकटी दिली.त्यांच्या नेतृत्वामुळे कोपरगाव तालुक्यासह परिसरातील सहकार चळवळीला नवे बळ मिळाले.शिक्षण क्षेत्रातही त्यांचे योगदान मोलाचे असून, रयत शिक्षण संस्थेच्या विस्तार आणि वाढीसाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा वारसा पुढे घेऊन जात ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे शिक्षण, उद्योग व सहकार क्षेत्रात अनेक संस्था उभ्या राहिल्या आणि हजारो कुटुंबांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यांच्या १०५ व्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष नारायणराव मांजरे यांनी केले आहे.



