निळवंडे आणि भंडारदरा परिसरातही पर्यटन केंद्र विकसीत करुन, रोजगार निर्मिती करण्यावर भर देण्यात येणार – ना.विखे पाटील

निळवंडे आणि भंडारदरा परिसरातही पर्यटन केंद्र विकसीत करुन, रोजगार निर्मिती करण्यावर भर देण्यात येणार – ना.विखे पाटील


निळवंडे आणि भंडारदरा परिसरातही पर्यटन केंद्र विकसीत करुन, रोजगार निर्मिती करण्यावर भर देण्यात येणार – ना.विखे पाटील
लोणी । प्रतिनिधी । पर्यटनाला वाव देण्यासाठी जलसंपदा विभागाने धरण परिसरात पर्यटन विकासाला प्राधान्य दिले असून, यासाठी विभागाचे कामही सुरु झाले आहे. जायकवाडी, माजलगाव, इसापुर या धरणांसह जिल्ह्यातील निळवंडे आणि भंडारदरा परिसरातही पर्यटन केंद्र विकसीत करुन, रोजगार निर्मिती करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहीती जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

शिर्डी अंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्री विखे पाटील यांनी स्वागत केले. याप्रसंगी पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे उपस्थित होते. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जलसंपदा विभागाच्या वतीने धरण पर्यटनाच्या संदर्भात घेतलेल्या धोरणाबाबत माहीती देताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने धरण परिसरामध्ये असलेल्या जलसंपदा विभागाच्या जागांचा उपयोग पर्यटन विकास केंद्रासाठी केला जाणार आहे. यासाठी एक धोरण निश्चित करण्यात आले असून, बहुराष्ट्रीय कंपन्या यासाठी सल्लागार म्हणून काम करणार आहेत.राज्यात प्राधान्याने जायकवाडी, इसापूर, माजलगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील निळवंडे आणि भंडारदरा परिसरातही हे पर्यटन धोरण विकसीत करण्याचा आपला प्रयत्न असून, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून पर्यटन विकासाचे काम सुरु करण्यात आले आहे. महामंडळाला आर्थिक स्त्रोत निर्माण व्हावेत तसेच रोजगाराची निर्मिती करण्याचा उद्देश यामध्ये असल्याचे स्पष्ट करुन, मंत्री विखे पाटील म्हणाले की, नवीन धोरणानूसार वॉटर स्पोर्ट, रिसोर्ट उभारुन पर्यटक आकर्षित होतील अशा पध्दतीचे नियोजनही या धोरणामध्ये असल्याचे ते म्हणाले.



