ब्रेकिंग

मेंगाळवाडी गावची कोमल किसन भूतांबरे यांची पोलीस खात्यात निवड

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून सत्कार

मेंगाळवाडी गावची कोमल किसन भूतांबरे यांची पोलीस खात्यात निवड

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून सत्कार
संगमनेर । प्रतिनिधी । तालुक्यातील मेंगाळवाडी या आदिवासी ठाकरवाडीतील सौ कोमल किसन भुतांबरे यांची नुकतीच पोलीस खात्यात निवड झाली असून तालुका व मेंगाळवाडी गावासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.  सौ कोमल किसन भुतांबरे पुणे जिल्हा पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल तिचा व तिचे पती किसन सुभाष भुतांबरे यांचा सत्कार लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी  मा आमदार डॉ.सुधीर तांबे, अजय फटांगरे, बाळकृष्ण गांडाळ, राजाराम भूतांबरे, सुभाष भुतांबरे, जनाबाई भूतांबरे ,किसन भुतांबरे ,सागर भुतांबरे मेंगाळवाडीतील नागरिक उपस्थित होते.

           यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्याने कायमच प्रतिकूल परिस्थितीत मात करत आपला विकास साधला आहे. मेंगाळवाडी या आदिवासी ठाकरवाडीतील सौ कोमल किसन भुतांबरे यांची पुणे जिल्हा पोलीस मध्ये झालेली निवड ही नक्कीच तालुका व मेंगाळवाडी गावासाठी अभिमानास्पद बाब आहे. यातून इतर विद्यार्थ्यांनीही आदर्श घेत स्पर्धा परीक्षा व इतरही महत्त्वाच्या परीक्षा जिद्दीने द्याव्यात. अपयशाची भीती न बाळगता प्रामाणिक प्रयत्न करावे असेही ते म्हणाले.                               बाळकृष्ण गांडाळ म्हणाले कि सौ.कोमल किसन भुतांबरे यांची पोलिस दलात निवड म्हणजे  तमाम आदिवासी समाजासाठी अभिमानाची बाब आहे. कोमल ने मिळविलेल्या यशाबद्दल  आदिवासी बांधवांच्या वतीने तिचे मनापासून अभिनंदन व तिच्या कडून सर्वसामान्य आदिवासी गोरगरिबांची सेवा व्हावी असेही ते म्हणाले 

            सौ कोमल किसन भुतांबरे यांचे मेंगाळवाडी गावातील लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक असलेल्या जेष्ठ कार्यकर्ते राजाराम गणपत भुतांबरे यांचे नातू किसन सुभाष भुतांबरे यांच्याशी लग्न झाले. पती व पत्नीने चिकाटी व जिद्द कायम ठेवत अकॅडमी मध्ये प्रॅक्टिस करत राहिले. आणि याचाच परिणाम म्हणून सौ.कोमल तिची पुणे जिल्हा पोलीस मध्ये निवड झाली आहे. कोमल किसन भूतांबरेच्या या निवडीबद्दल तालुक्यातील सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!