के. जे. सोमैया महाविद्यालयात बुधवारी वार्षिक पारितोषिक वितरण

के. जे. सोमैया महाविद्यालयात बुधवारी वार्षिक पारितोषिक वितरण


के. जे. सोमैया महाविद्यालयात बुधवारी वार्षिक पारितोषिक वितरण
कोपरगांव । प्रतिनिधी । स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात येत्या 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी श्री साईबाबा संस्थान, शिर्डी चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते व संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होत आहे अशी माहिती प्राचार्य प्रो. डॉ. विजय ठाणगे यांनी दिली आहे. या समारंभात शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व इतर क्षेत्रात नेत्रदिपक यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्राध्यापकांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी संस्थेचे सचिव अॅड संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे कार्याध्यक्ष डॉ. गणेश शिंदे यांनी केले आहे.



