आजपासुन श्री क्षेत्र शहापुर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन
सप्ताह कालावधीत राज्यभरातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा

आजपासुन श्री क्षेत्र शहापुर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

सप्ताह कालावधीत राज्यभरातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा
कोपरगांव । प्रतिनिधी । सर्व भाविक-भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की, सालाबादप्रमाणे याही वर्षी भगवंताच्या कृपेने, साधु संताच्या आशिर्वादाने श्री क्षेत्र शहापूर, ता. कोपरगाव येथे वै.ह.भ.प. जाधव गुरुजी, शिर्डी व वै. ज्ञानेश्वर माऊली गायकवाड, कानळद सेवा आश्रम यांच्या कृपाशिर्वादाने ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शिंदे माऊली. साई आश्रम व प.पू. गुरुवर्य महंत ज्ञानेश्वर दासजी महाराज, कानळद सेवा आश्रम यांच्या मार्गदर्शनाने तसेच समस्त ग्रामस्थ शहापुर यांच्या मार्गदर्शनाने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास सोमवार दिनांक 13 एप्रिल रोजी सप्ताह सोहळ्यास प्रारंभ होत आहे या सप्ताहात कालावधी दररोज विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आलेले आहे.

या काळात राज्यभरातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा सप्ताह कालावधीत संपन्न होणार आहेयामध्ये 13 एप्रिल रोजी ह.भ.प. ऋषिकेश महाराज कुईटे (निफाड) 14 एप्रिल रोजी ह.भ.प. संत सुखदेव महाराज ( वाकी संस्थान ) ,15 एप्रिल रोजी ह.भ.प. हरिशरणगिरीजी महाराज ( बाजाठाण ) 16 एप्रिल रोजी ह.भ.प. उद्धव महाराज पवार ( येवला ),17 एप्रिल रोजी ह.भ.प.गोरक्षनाथ महाराज देठे ( आडगाव ) ,18 एप्रिल रोजी ह.भ.प.श्री.गुरू.ज्ञानेश्वर महाराज कदम ( मोठे माऊली आळंदी ) , 19/ एप्रिल रोजी ह.भ.प. गुरू ज्ञानेश्वर महाराज शिंदे ( मोठे माऊली आळंदी ), 20 एप्रिल प.पु.गुरूवर्य संत श्री महंत ज्ञानेश्वर दास महाराज त्यागी ( कानळद ) यांचे सकाळी 10 ते 12 कालावधीत काल्याचे किर्तन तसेच यावेळी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान यावेळी शहापुर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे.




