ब्रेकिंग

निळवंडे धरणातून लाभक्षेत्रासाठी उन्हाळी आवर्तन सोडावे

निळवंडे धरणातून लाभक्षेत्रासाठी उन्हाळी आवर्तन सोडावे

निळवंडे पाट पाणी कृती समितीची मागणी
संगमनेर । प्रतिनिधी । लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागातील 182 गावांसाठी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून पिण्यासाठी पाणी व पशुधन वाचवण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज आहे त्यामुळे प्रशासनाने निळवंडे धरणातून लाभक्षेत्रासाठी उन्हाळी आवर्तन सोडावी अशी आग्रही मागणी निळवंडे पाट पाणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

घुलेवाडी येथील कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांच्या कार्यालयात कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पाणी सोडण्याबाबतच्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे, प्रभाकर गायकवाड, विजय मगर, विलास गुळवे ,मच्छिंद्र काळे, दत्ता भालेराव, अनिल गुंजाळ ,संतोष राऊत यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते. ही निवेदन कार्यकारी अभियंता कवडे व हापसे यांनी स्वीकारले.सध्या सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढत आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी कमतरता निर्माण झाली आहे याचबरोबर पशुधनासाठी ही पाण्याची आवश्यकता आहे लाभक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी उभी केलेली पिके जळून चालली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह पशुधनासाठी व उभे असलेल्या पिकांसाठी पाण्याची अत्यंत गरज आहे.लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागातील 182 गावांसाठी हे धरण व कालवे पूर्ण केले मात्र सध्याचे प्रशासन शेतकऱ्यांच्या बाबत अत्यंत उदासीन असून आता उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी कोणतीही तडजोड न करता तातडीने एप्रिल अखेरपर्यंत आवर्तन मिळाले पाहिजे अशी मागणी अध्यक्ष नानासाहेब शेळके यांनी केली तर सचिव उत्तमराव घोरपडे म्हणाले की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे मात्र त्यालाच उपाशी ठेवले जात आहे पाणी मिळत नसेल तर आम्हाला गुरे ढोरे व माणसांसह रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन छडावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.यानंतर कार्यकारी अभियंता हापसे व कवडे यांनी आपल्या मागणीचा विचार करून या महिनाअखेरीस पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. या मागणीमुळे तळेगाव सह दुष्काळी भागातील सर्व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पाठ पाणी कृती समितीने घेतलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याला सर्व गावातील जनतेने पाठिंबा दिला आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!