सौ.ज्योतीताई वालझाडे यांची अहमदनगर जिल्ह्यात प्रथम महिला विक्रीकर अधिकारी पदी नियुक्ती
सौ.ज्योतीताई वालझाडे यांची अहमदनगर जिल्ह्यात प्रथम महिला विक्रीकर अधिकारी पदी नियुक्ती
संगमनेर (विनोद जवरे ) काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते व राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक व निवृत्त नायब तहसिलदार शशिकांत दळवी यांच्या कन्या सौ ज्योतीताई अरविंद वालझाडे यांची अहमदनगर जिल्ह्यात प्रथम महिला विक्रीकर अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
सौ ज्योतीताई अरविंद वालझाडे या संगमनेर येथील शशिकांत दळवी यांच्या कन्या आहेत. त्या अहमदनगर जिल्हा येथील विक्रीकर कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेत त्यांची पदोन्नती होऊन त्यांची जिल्हा विक्रीकर अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात पहिली महिला विक्रीकर अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.या यशस्वी कामगिरी बद्दल त्यांचे राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात ,आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे ,इंद्रजीत भाऊ थोरात, डॉ.जयश्री ताई थोरात, निवृत्त तहसिलदार शशिकांत दळवी, एडवोकेट विठ्ठलराव साबळे, कृष्णकांत साळुंके ,अरविंद दारूणकर, विजयराव काळे ,डॉ. निलेश सातपुते ,डॉ. भोलाने , जिल्हा तिळवण तेली समाज व तैलिक महासभेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे