ना.थोरात यांच्या उपस्थितीत रविवारी गंगामाई घाट सुशोभीकरणाचा शुभारंभ व विविध विकास कामांचे लोकार्पण
ना.थोरात यांच्या उपस्थितीत रविवारी गंगामाई घाट सुशोभीकरणाचा शुभारंभ व विविध विकास कामांचे लोकार्पण
संगमनेर ( विनोद जवरे ) राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासातून वैभवाकडे वाटचाल करणाऱ्या संगमनेर शहरात गंगामाई घाटाचे सुशोभीकरण शुभारंभ व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 22 मे 2022 रोजी सायंकाळी 5 वा. महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले असून सायंकाळी 6.30 वा. रंगारगल्ली, सोमेश्वर मंदिर या ठिकाणी सभा होणार आहे.
महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. शहरात विविध वैभवशाली इमारतीसह सध्या शहराला जोडणाऱ्या चारही मुख्य रस्त्यांचे चौपदरीकरण व सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. ऐतिहासिक व पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या गंगामाई घाटाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच शहरातील प्रभाग 1 ते 14 मधील विविध रस्त्यांचे खडीकरण, मजबुतीकरण , डांबरीकरण, काँक्रिटीकरण ट्रिमिक्स कॉंक्रिटीकरण यांसह विविध कामांचा समावेश आहे.
रविवारी सायंकाळी 5 वा. महसूलमंत्री व विधिमंडळ पक्षनेते नामदार थोरात,आमदार डॉ. तांबे व नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सप्तशृंगीदेवी मंदिर अकोले बायपास येथे विविध विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. यानंतर 5.15 वा.दिवटे किराणा नाशिक पुणे हायवे, 5.30 वा.नवीन नगर रोड लिंक रोड येथे 5.45 वा.अलका नगर येथे 6 वा. सय्यद बाबा चौक,6.15 वा गंगामाई घाट या परिसरात लोकार्पण होणार आहे. आणि त्यानंतर 6.30 वा. सोमेश्वर मंदिर रंगारगल्ली या ठिकाणी भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सर्व आजी माजी नगरसेवक विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या उद्घाटन कार्यक्रमांसाठी व सभेसाठी शहरातील नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी व प्रशासक डॉ शशिकांत मंगरूळे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे.