ब्रेकिंग

गायत्री कंपनीने वाहनांच्या भरधाव वेगाला आवर घालावा – माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण

गायत्री कंपनीने वाहनांच्या भरधाव वेगाला आवर घालावा – माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण

              कोपरगाव । विनोद जवरे ।

कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गाचे काम सुरु असून काम ते आता अंतिम टप्प्यात आले आहे काम सुरू झाल्यापासुनच कंपनीच्या वाहनांचा वेग हा काळजीचा विषय बनला आहे. काम लवकर पुर्ण करण्यासाठी गायत्री कंपनी घाई करत आहे. डंपर च्या साह्यांने वाहतूक करत असताना चालक वेगावर नियंत्रण न ठेवता अति भरधाव वेगाने वाहन चालवत असतात रस्त्याने जाणाऱ्या येनाऱ्या नागरिकांच्या जीवाची पर्वा सुद्धा केली जात ही वाहतूक ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात तुन केली जात असते. रस्त्याच्या कडेने शेतकरी व नागरिक जात असतात गायत्री कंपनीचे वाहने भरधाव वेगाने जात असल्यामुळे नागरिकांना रस्त्याने चालणे अवघड होऊन नागरिकांना जीवघेणा ठरत आहे. आज दि. १९ मे रोजी जेऊर कुंभारी परिसरात किरण परसराम
गुरसळ हे आपल्या शेतात जात असतांना गायत्री कंपनीच्या वाहनांचा त्यांना धक्का लागुन जखमी झाले आहे ही घटना माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण यांना समजताच घटनास्थळी दाखल झाले व गायत्री कंपनीचे वाहतूक करणारे डंपर अडवुन वेगावर नियंत्रण ठेवण्याची तंबी देण्यात आली तसेच परीसरातील
नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर सहन केला जाणारी असे काही घडल्यास गायत्री कंपनीचे काम बंद केले जाईल असा इशारा माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी गायत्री कंपनीच्या वाहन चालक व अधिकाऱ्यांना दिला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!