ब्रेकिंग

नागपूर विद्यापीठाच्या विस्तार व शिक्षण परिषदेवर राजेश परजणे यांची नियुक्ती

नागपूर विद्यापीठाच्या विस्तार व शिक्षण
परिषदेवर राजेश परजणे यांची नियुक्ती

नागपूर विद्यापीठाच्या विस्तार व शिक्षण
परिषदेवर राजेश परजणे यांची नियुक्ती

कोपरगांव  । प्रतिनिधि । नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (माफसू) विस्तार व सतत शिक्षण परिषदेवर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे माजी अध्यक्ष व कोपरगांव येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश नामदेवराव परजणे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु यांच्या कार्यालयाकडून श्री परजणे यांना नियुक्तीबाबतचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. नागपूर विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेली विस्तार व सतत शिक्षण परिषद ही महाराष्ट्रातील एक नामांकीत परिषद असून शिक्षण, संशोधन आणि समाज यांना जोडणारी महत्वाची संस्था आहे. विशेषतः शेतकरी, पशुपालक आणि मत्स्य व्यावसायिकांना आधुनिक तंत्रज्ञान व प्रशिक्षण देऊन त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे, नवीन तंत्रज्ञान व संशोधनांचे प्रसारण करणे, ग्रामीण भागात जागृती व कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे, पशुधन जागृती अभियान राबविणे, कृत्रिमरेतन, दुग्ध उत्पादन, कुक्कुटपालन व शेळीपालन यासंबंधीचे प्रशिक्षण देणे, महिलांसाठी स्वयंसहाय्य गटासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे, विद्यापीठातील शिक्षण व संशोधनाचा प्रत्यक्ष उपयोग समाजापर्यंत पोहोचविणे, प्राणी व मत्स्य विज्ञानाच्या विस्तारासाठी व तत्सम शिक्षणाचा सतत प्रसार व प्रचार होण्याच्यादृष्टीने ही परिषद काम करीत असून अशा परिषदेवर राज्यातील काही अभ्यासू व कार्यकुशल व्यक्तिंची सदस्य म्हणून नियुक्ती केली जाते. महानंदचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर यांनी नागपूर विद्यापीठाकडे महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघामार्फत अहिल्यानगर जिल्ह्यातून (सहकारी दुग्ध संस्था विभागातून) राजेश परजणे यांच्या नांवाची शिफारस केलेली होती.श्री परजणे यांचा दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन क्षेतातला गाढा अभ्यास असून त्यामाध्यमातून जनावरांचे आरोग्य, त्यांचे संगोपन आणि व्यवस्थापन याबाबत ते सतत सक्रीय असतात. याशिवाय जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून काम करीत असताना शिक्षण समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. जिल्हा परिषद शाळांचा विस्तार करण्याबरोबरच या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या व त्यांची गुणवत्ता वाढविण्याच्यादृष्टीने त्यांनी काम केलेले आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे प्रयोग व प्रकल्प राबवून अहिल्यानगर जिल्ह्यातील शैक्षणिक वाटचालीस लक्षवेधी आयाम त्यांनी मिळवून दिलेला आहे. प्राणी आणि शिक्षण याविषयीचा श्री परजणे यांचा सखोल अभ्यास विचारात घेऊन नागपूर विद्यापीठाने विस्तार व सतत शिक्षण परिषदेवर त्यांना सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. या नियुक्तीबद्दल राज्याचे जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर आदिंनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!