आंभोरे सोसायटीची निवडणूक बिनविरोध
आंभोरे सोसायटीची निवडणूक बिनविरोध
संगमनेर (प्रतिनिधी ) अंभोरे येथील सेवा सहकारी सेवा सोसायटीची निवडणूक महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व महानंदचे अध्यक्ष व राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली असून सर्वांना बरोबर घेत बिनविरोधची परंपरा जपत या गावाने आदर्श निर्माण केला आहे. अंभोरे गावामध्ये राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध विकास कामे होत आहेत. सहकारी संस्था सक्षम करतांना दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी कायम सर्व समाजातील सर्व घटकांना समान संधी देत विकासाची वाटचाल सुरू ठेवली आहे . यापूर्वी ही ह.भ. प. नारायण गिरी महाराज सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या संचालक मंडळाची ही निवडणूक बिनविरोध झाली होती. विशेष मध्ये या निवडणुकीत 17 जागांसाठी 17 चा अर्ज आले होते.सर्वसमावेशकतेची हीच परंपरा कायम ठेवत सेवा सोसायटीची निवडणूकही बिनविरोध झाली असून इतरांसाठी सर्वांसाठी हा एक आदर्श आहे.सेवा सोसायटीच्या सर्वसाधारण गटातून सूर्यभान खेमनर ,रावजी खेमनर, दगडू खेमनर ,दगडू बिरू खेमनर , रमेश केरू खेमनर ,शिवराम खेमनर ,शिवाजी खेमनर, बाबुराव बाचकर हे बिनविरोध निवडले गेले आहे .तर भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून वाल्मीक सोपान खेमनर, इतर मागास वर्ग मतदारसंघातून सोपान नामदेव कोटकर ,अनुसूचित जाती- जमाती मतदारसंघातून शिवाजी मारुती गवारे, महिला राखीव मतदारसंघातून सईबाई भाऊसाहेब वाघमोडे व शांताबाई धोंडिबा पुणेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध होणे कामी ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख आंभोरकर व गावचे सरपंच भास्कर खेमनर यांनी विशेष प्रयत्न केले.
हे सर्व उमेदवार बिनविरोध करण्याकरता सहादू खेमनर, सोपान खेमनर, बबन खेमनर ,रावसाहेब खेमनर, बाबुराव खेमनर, संपत खेमनर, अनिल खेमनर, लहानु भिमा खेमनर किसनराव खेमनर, भाऊसाहेब खेमनर, रभाजी खेमनर, किसन खेमनर ,बाबुराव जगनर, दत्तात्रय खेमनर, म्हसू खेमनर, तुळशीराम मलगुंडे, भागवत जगनर, दत्तात्रय मडके, शिवाजी विठोबा गवारे, विठोबा खेमनर, लक्ष्मण खेमनर यांनीही प्रयत्न केले.या बिनविरोध निवडीबद्दल राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पा. खेमनर ,एडवोकेट माधवराव कानवडे,सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, रणजितसिंह देशमुख, सत्यजित तांबे ,बाबासाहेब ओहोळ ,गणपतराव सांगळे ,शंकर पा. खेमनर ,बाळासाहेब आंभोरकर, सरपंच भास्कर खेमनर आदींनी अभिनंदन केले आहे