गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या डॉक्टरवर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांचे पथकाकडून कारवाई

गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या डॉक्टरवर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांचे पथकाकडून कारवाई


गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या डॉक्टरवर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांचे पथकाकडून कारवाई
श्रीरामपूर । प्रतिनिधी । पिंपरी निर्मळ शिवारामध्ये एका घरात नेवासा येथील डॉक्टर भणगे हा गर्भलिंग निदान चाचणी करत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. सदरचा डॉक्टर हा पोर्टेबल USG मशीन चार चाकी गाडीमध्ये घेऊन गरोदर महिलांची गर्भ लिंग निदान चाचणी करत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ त्यांचे कार्यालयातील पथक रवाना केले. माहितीची खात्री पडताच स्वतः तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर श्री जयदत्त भवर, api आठरे लोणी हे देखील सदर ठिकाणी पोहोचले. त्यापूर्वीच लोणी पोलीस स्टेशन येथे एक महिला कर्मचारी बनावट गरोदर महिला म्हणून त्या ठिकाणी पाठवली. पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता डॉक्टर भनगे हा त्याच्याकडील एजंट अभिजीत दिलीप भुसार याचे सह गर्भवती महिलांची लिंग निदान चाचणी करताना मिळून आला. या दोघांनाही ताब्यात घेऊन अटक केली आहे एकूण आठ गर्भवती महिला सदर ठिकाणी मिळून आल्या. या सर्व महिलांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी सहा महिलांचे कुटुंबीय/ नवरे यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे व अटक करण्यात आली आहे.लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी PCPNDT कायद्याखाली तसेच महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायदा खाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



