ब्रेकिंग
महाराष्ट्र राज्याने इंधनाचे दर कमी करावे-विक्रम पाचोरे
महाराष्ट्र राज्याने इंधनाचे दर कमी करावे-विक्रम पाचोरे

कोपरगांव । विनोद जवरे ।
केंद्र शासनाने महागाई आटोक्यात आणण्यांसाठी पेट्रोल डिझेल इंधनावरील दर व गॅस सिलेंडरचे दर कमी केले आहे मात्र राज्य शासनाने हे दर कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावी अशा आशयाचे निवेदन कोपरगांव तालुका भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे व शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी तहसिलदार विजय बोरूडे यांना बुधवारी दिले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनावरील दर कमी केले आहे. केंद्राने जेव्हढे दर कमी केले तेव्हढेच दर राज्य शासनाने कमी करून येथील वाहनधारकासह नागरिकांना दिलासा द्यावा, अन्य राज्यानी मोठया प्रमाणांत इंधन दरात कपात करून दिलासा दिला आहे, मात्र राज्यातील महाविकास आघाडी शासन त्यांचे मंत्री हे प्रसारमाध्यमावर केंद्र सरकार विरोधात टिका करतात, वाहनधारकासह नागरिकामध्ये गैरसमज पसरवतात. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोविड काळात पंतप्रधानांशी थेट संवाद साधताना राज्याच्या जीएसटी बाबत सुतोवाच केले, मात्र इंधनावरील कर कपात करून दिलासा द्यावा अशी सुचना पंतप्रधान मोदी यांनी केली होती त्यावर जाहिरपणे भाष्य करणे त्यांनी टाळले असे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे म्हणाले. पुरवठा अव्वल कारकुन ए. बी. गायकवाड, आर. एस. उदावंत यांनी निवेदनाचा स्विकार केला. याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले, गोपिनाथ गायकवाड, राजेंद्र बागुल, रविंद्र लचुरे, दत्तात्रय कोळपकर, सागर कोपरे, रोहन दरपेल, अर्जुन माकोणे यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.