ब्रेकिंग

स्व.विलासराव देशमुख हे राज्यातील कार्यकर्त्यांचे प्रेरणास्त्रोत – आ.डॉ.तांबे

संगमनेरकरांनी  जागवल्या  आठवणी

स्व.विलासराव देशमुख हे राज्यातील कार्यकर्त्यांचे प्रेरणास्त्रोत – आ.डॉ.तांबे
संगमनेर ( विनोद जवरे ) आपल्या अष्टपैलू नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान देताना स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी सतत कार्यकर्ते जोडले. महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्यावर बंधू प्रमाणे प्रेम करणारे हसतमुख व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले स्व  विलासराव देशमुख हे राज्यातील कार्यकर्त्यांचे सदैव प्रेरणास्रोत ठरले असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.यशोधन संपर्क कार्यालयात स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, इंद्रजित भाऊ थोरात ,साई संस्थानचे विश्वस्त ॲड सुहास आहेर, ॲड.अशोक हजारे युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, एनएसयुआय चे तालुकाध्यक्ष गौरव डोंगरे ,ॲड नानासाहेब शिंदे, तात्याराम कुटे ,सादिक तांबोळी,आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले की, विविध प्रश्नांची जाण असणारे स्वर्गीय विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. विकास कामांची दूरदृष्टी, तत्परता, हसतमुख स्वभाव यामुळे राज्यातील जनतेच्या मनावर त्यांनी अधिराज्य केले.   विलासराव देशमुख यांनी सातत्याने महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्यावर व संगमनेर तालुक्यावर खूप प्रेम केले. संगमनेर तालुका हा काँग्रेस पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिलेला आहे.  नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात पक्षाचे मोठे काम होत असून महसूलमंत्री नामदार थोरात राज्यात अत्यंत महत्त्वाच्या जबाबदा-या सांभाळत आहेत.  संगमनेर तालुक्यातील अनेक ऐतिहासिक योजना पूर्ण करताना विलासराव देशमुख यांनी मोठे सहकार्य केले आहे. संगमनेर शहरातील निळवंडे थेट पाईपलाईन योजना ही देशमुख साहेबांच्या काळात मंजूर झालेली आहे. त्यांच्या आठवणी व केलेले कार्य हे महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देणारे असल्याचे ते म्हणाले.
तर बाबा ओहोळ म्हणाले की, स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. काँग्रेस पक्षाची भक्कम फळी त्यांनी उभे केली. अनेक तरुणांना मोठ्या संधी दिल्या. महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यात व उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस अधिक सक्षम करत तरुणांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे स्वप्न पूर्ण करावे असेही ते म्हणाले.यावेळी ॲड. सुहास आहेर ,सुभाष सांगळे गौरव डोंगरे यांनीही  आपले मनोगत व्यक्त केले
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!