ब्रेकिंग

साई राम मित्र मंडळाचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद – ईश्वरी रहाणे

जवळके येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

साई राम मित्र मंडळाचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद – ईश्वरी रहाणे

जाहिरात मो-7756045359

जवळके येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

कोपरगांव । प्रतिनिधी । साई राम मित्र मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाला दाद देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय रहाणे होते यावेळी तसेच पालकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांना साईबाबांची शाल तसेच वह्या पेन तसेच माऊलींचे हरिपाठाचे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला

🔹 गौरविण्यात आलेले विद्यार्थी:

गायत्री पाचोरे – 69.00
विजय गुंजाळ – 68.00
साक्षी देशमुख – 65.50
रोहिणी कांडेकर – 82.00
श्रावणी कोल्हे – 80.33
पल्लवी मोरे – 78.33

सृष्टी राहणे-86.20
श्रुती मैड – 85.80
अश्विनी रहाणे – 83.20
ईश्वरी रहाणे – 83.00
ऋतुजा रहाणे -83.00
राहुल रहाणे – 83.00
सिध्दी गव्हाणे – 80.60
संस्कृती थोरात – 80.00

विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करत मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. साई राम मित्र मंडळाच्या भक्तांनी त्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

या सोहळ्याला ह.भ.प.विजय महाराज रहाणे,भाऊसाहेब ( भाऊ ) रहाणे,राजेंद्र नेहे,साईराम महाराज रहाणे,लक्ष्मण सरवार,राहुल सरवार, आशा रहाणे,मनिषा सरवार ,संगिता शिंदे, रश्मी रहाणे, आणि साई भक्त उपस्थित राहुन कार्यक्रम अधिकच संस्मरणीय केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल साई राम मित्र मंडळ यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!