नवीन लोकप्रतिनिधीच्या स्टंटबाजीमुळे अनेक तरुणांना ताटकळत उभे राहावे लागले


नवीन लोकप्रतिनिधीची फोटोसाठी आरटीओ कॅम्प मध्ये स्टंटबाजी – बाळासाहेब गायकवाड

या उलट संगमनेर तालुक्यासाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालय असावे यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून क-हे घाट या ठिकाणी आरटीओ ड्रायव्हिंग साठी रोडही उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचबरोबर जुनी पंचायत समिती कार्यालय हे आरटीओ विभागाला देण्याचा ठराव देण्यात आला. संगमनेर तालुका विकसित असल्याने गाड्यांची मोठी संख्या आहे .याचबरोबर अकोले तालुका संलग्न असल्याने नवी वाहन घेणारे व नवीन युवक यांचे लायसन याकरता संगमनेर मध्ये स्वतंत्र आरटीओ कार्यालय असावे याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केला आहे.सध्या लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या सभागृहामध्ये आरटीओ विभागाचे शासकीय काम सुरू असते. शासकीय काम सुरळीत सुरू असताना यातून नेमके काय साध्य करायचे आहे हा मोठा प्रश्न आहे . यामुळे सकाळपासून लाईन मध्ये असलेल्या अनेक तरुणांना ताटकळत उभे राहावे लागले . अनेक ज्येष्ठांचा वेळ वाया गेला. याप्रसंगी तालुक्यामध्ये सध्या टक्केवारी व हप्तेवसुलीची जोरदार चर्चा सुरू होती शासकीय कामांमध्ये विनाकारण अडथळा करून स्टंटबाजी करू नये असे आवाहन उपस्थित सर्व तरुणांनी केले आहे.



