ब्रेकिंग

रुग्णांना अधिक चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध द्या – आमदार आशुतोष काळे

कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरच पूर्ण होणार

रुग्णांना अधिक चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध द्या – आमदार आशुतोष काळे

कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरच पूर्ण होणार

कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव सनियंत्र सल्लागार समितीची बैठक नुकतीच आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत रुग्णालयातील आरोग्य सेवा, उपलब्ध सुविधा तसेच रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांच्या गुणवत्तेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी रुग्णालय प्रशासनाला रुग्णांना अधिक चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, आवश्यक औषधे व वैद्यकीय सुविधा उपलब्ध असाव्यात तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.तसेच रुग्णालयातील स्वच्छता, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाय योजना तातडीने राबविण्याच्या सूचना केल्या. सर्वसामान्य नागरिकांना शासकीय आरोग्य सेवांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी रुग्णालय सनियंत्र सल्लागार समितीच्या सदस्यांसमवेत २८.८४ कोटी निधीतून सुरु असलेल्या १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला. उपजिल्हा रुग्णालयाच्या कामासाठी अधिकच्या निधीची गरज पडल्यास निधी मिळवून देणार असल्याचे सांगत लवकरच हे काम पूर्ण होऊन सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय रुग्णांच्या सेवेत दाखल होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी तहसीलदार महेश सावंत, गट विकास अधिकारी संदीप दळवी, आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गुट्टे, डॉ.कृष्णा फुलसुंदर, डॉ.उंबरकर, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ.अजय गर्जे, सार्वजनिक बांधकाम उपभियांता वर्षराज शिंदे, पशु संवर्धन अधिकारी श्रीमती काटे, नगरसेवक इम्तियाज अत्तार, सौ.कविता नाईकवाडे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, डॉ. आतिश काळे, डॉ. तुषार गलांडे, नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, हाजीमेहमूद सय्यद, विजय त्रिभुवन, वाल्मिक लहिरे, शैलेश साबळे, सोमेश आढाव, बाळासाहेब रुईकर, माजी नगरसेवक विरेन बोरावके, रमेश गवळी, बाळासाहेब आढाव, अजीज शेख, फकीर कुरेशी, दिनकर खरे, सचिन ठोळे, नवाज कुरेशी, शुभम काळे, मनोज नरोडे, धनंजय कहार, सागर फडे, मुकुंद भूतडा, नितेश बोरुडे, सागर आहेर, संतोष मरसाळे, अशोक आव्हाटे, सचिन परदेशी, मुकुंद इंगळे, जावेद शेख, भाऊसाहेब भाबड, चंद्रकांत धोत्रे, राजेंद्र आभाळे, राजेंद्र खैरनार, संतोष दळवी, विकी चांदर, तन्मय साबळे, वैभव कानडे, हारुन शेख, फैय्याज, मयुरेश शिंदे, मयुर राऊत, बाबासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!