रवंदे येथे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन संपन्न
रवंदे येथे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन संपन्न
कोपरगाव । विनोद जवरे ।
कोपरगाव येथील श्री सद्गुरु गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स व संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व शिक्षण संचालनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाळासाहेब कचरू कदम यांच्या हस्ते संपन्न झाले.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप होते. यावेळी मार्गदर्शन करताना बाबासाहेब कदम यांनी विद्यार्थ्यांना शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या तसेच सर्वांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे असे सांगितले. गावात सात दिवस शिबिरस्थळी राहून आपण गावची सेवा करणार असल्याने नक्कीच आपणावर चांगले मूल्य व श्रमसंस्कार होणार आहेत.
यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून श्रमसंस्कार शिबिराच्या आयोजनाचे महत्त्व सांगितले. तसेच रवंदे गावात ग्राम स्वच्छता करताना विद्यार्थ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात काम करून गावची शाब्बासकी मिळवली पाहिजे असे सांगितले.
यावेळी रवंदे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष अशोकमामा काळे यांनीही मुलांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमास उपसरपंच संदीप कदम, मुख्याध्यापक बी. आर. बीरे, पी.के. कदम, केशव कंक्राळे, उत्तम भुसे, प्रल्हाद वाघ, नामदेव घायतडकर, संजय काळे, उपप्राचार्य प्रा. संजय शिंदे , प्रा. डॉ. देविदास रणधीर, प्रा. एस. पी. हाडोळे, कार्यक्रमाधिकारी प्रा. महेश दिघे, प्रा. डॉ. बाळासाहेब वाघमोडे इत्यादी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कार्यक्रमाधिकारी डॉ. बंडेराव तऱ्हाळ यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. सुरेश काळे यांनी केले.