ब्रेकिंग

प्रवरा अभिमत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रवरा अभिमत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जाहिरात मो-7756055359

प्रवरा अभिमत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोणी । प्रतिनिधी । योगा फॉर हेल्दी एजींग या संकल्पनेला अनुसरून प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (अभिमत विद्यापीठ) येथील क्रीडा मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना, तसेच प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने १८ ते २१ जून दरम्यान विविध स्पर्धा व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


नर्सिंग कॉलेजच्या एमपीएच हॉलमध्ये आयोजित या स्पर्धांमध्ये विद्यापीठाच्या विविध घटक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. यामध्ये योग प्रात्यक्षिक, वक्तृत्व, रांगोळी आणि रील मेकिंग अशा वैविध्यपूर्ण स्पर्धांचा समावेश होता.
योग प्रात्यक्षिक स्पर्धा- प्रथम क्रमांक प्रांजली राऊत, द्वितीय क्रमांक मिताली राऊत. वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक भूमी माळी, द्वितीय क्रमांक (संयुक्त) वरदराज बोलाज व अदिती भुरणवाल. रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक वेदिका कठार व कार्तिकी शेलोटकर, द्वितीय क्रमांक, तनिक्षा सनप व स्नेहा जाधव. रील मेकिंग स्पर्धा प्रथम क्रमांक हर्षल उशीर, मयूर प्रजापत, जितेंद्र चव्हाण व विनय चव्हरे, द्वितीय क्रमांक दीक्षा किरी व ऋतुजा बनकर. विशेष द्वितीय क्रमांक गट गोविंदा होलांबे, अथर्व भट्टर, वेदांत दंडवते व ऋचित कासटके.
अधिष्ठाता डॉ. सतीश महाजन याचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी शेकडो विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी एकत्र येत सामूहिक योग प्रात्यक्षिके केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष व कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, विश्वस्त सौ. सुवर्णाताई विखे पाटील, विश्वस्त ध्रुव विखे पाटील, विश्वस्त मोनिकाताई सावंत, कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे आणि कुलसचिव डॉ. रवींद्र लवारे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे मुख्य संयोजन व समन्वयन क्रीडा संचालक आणि रासेयो समन्वयक डॉ. सुनील बुलार, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश आहेर, डॉ.भावना गांगुर्डे आणि डॉ. प्रशांत सरडे यांनी केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!