ब्रेकिंग

किसान सन्मान निधी योजनेचा २३ वा हप्ता खात्यात जमा; जिल्ह्यातील ५.६६ लाख शेतकऱ्यांना १११ कोटींचे अनुदान – मंत्री विखे पाटील

किसान सन्मान निधी योजनेचा २३ वा हप्ता खात्यात जमा; जिल्ह्यातील ५.६६ लाख शेतकऱ्यांना १११ कोटींचे अनुदान – मंत्री विखे पाटील

जाहिरात मो-7756055359
किसान सन्मान निधी योजनेचा २३ वा हप्ता खात्यात जमा; जिल्ह्यातील ५.६६ लाख शेतकऱ्यांना १११ कोटींचे अनुदान – मंत्री विखे पाटील

लोणी । प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या ‘किसान सन्मान निधी’ योजनेचा २३ वा हप्ता जिल्ह्यातील ५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे १११ कोटी ३७ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. या योजनेच्या २३ व्या हप्त्याचे अनुदान नुकतेच जिल्ह्यातील ५ लाख ६६ हजार ८०६ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे.

जिल्ह्यातील तालुकावार मिळालेले अनुदान खालीलप्रमाणे आहे: अकोले: ३५ हजार ०९० शेतकऱ्यांना ७ कोटी १ लाख ८० हजार रुपये, जामखेड: ३० हजार ९१४ शेतकऱ्यांना ६ कोटी १८ लाख २८ हजार रुपये, कर्जत: ४४ हजार ०९५ शेतकऱ्यांना ८ कोटी ८१ लाख ९० हजार रुपये, कोपरगाव: २८ हजार ३६९ शेतकऱ्यांना ५ कोटी ७२ लाख ७८ हजार रुपये, अहिल्यानगर: ३१ हजार ३५३ शेतकऱ्यांना ६ कोटी २७ लाख ६ हजार रुपये, नेवासा: ५४ हजार ५९८ शेतकऱ्यांना १० कोटी ९१ लाख ६ हजार रुपये, पारनेर: ५१ हजार १३६ शेतकऱ्यांना १० कोटी २२ लाख ७२ हजार रुपये, पाथर्डी: ४० हजार ९७० शेतकऱ्यांना ८ कोटी १९ लाख ४० हजार रुपये, राहाता: २४ हजार ७११ शेतकऱ्यांना ४ कोटी ९४ लाख २२ हजार रुपये, राहुरी: ३८ हजार ३६१ शेतकऱ्यांना ७ कोटी ७२ लाख ६२ हजार रुपये, संगमनेर: ५९ हजार ४०३ शेतकऱ्यांना ११ कोटी ८८ लाख ६ हजार रुपये, शेवगाव: ४३ हजार ७९८ शेतकऱ्यांना ८ कोटी ७५ लाख ९६ हजार रुपये, श्रीगोंदा: ५० हजार ९०१ शेतकऱ्यांना १० कोटी १८ लाख २ हजार रुपये, श्रीरामपूर: २२ हजार ६१२ शेतकऱ्यांना ४ कोटी ५२ लाख ४ हजार रुपयांचे रूपयांचे अनुदान मंजूर झाले असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या ‘किसान सन्मान निधी’ योजनेमध्ये सातत्य ठेवले आहे. तसेच राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ सुरू केली आहे.केंद्र आणि राज्य सरकारने नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी सरकारने सुरू केली असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!