थोरात कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीवर 50 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प

थोरात कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीवर 50 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प


थोरात कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीवर 50 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीवर उभारण्यात आलेल्या 50 किलो वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी समवेत व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, संचालक विजय राहणे ,गुलाबराव देशमुख ,विलास शिंदे ,योगेश भालेराव ,सतीश वर्पे, मदन आंबरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर ,सेक्रेटरी किरण कानवडे , किशोर देशमुख, दिगंबर मुळे यांच्यासह विविध अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात सहकारी साखर कारखान्याने पुढील पन्नास वर्षांचे नियोजन करून नव्याने 5500 मे.टन व 30 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला. हा नवा प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक ठरला. सभासद शेतकरी ऊस उत्पादक कामगार या सर्वांचे हित जोपासताना कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम करताना विकासात मोठे योगदान दिले आहे.कारखान्याने नव्याने अत्यंत अद्यावत अशी भव्य प्रशासकीय इमारत उभारली असून या इमारतीच्या छतावरती वीज बचत व वीज निर्मिती करिता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे. 50 किलो वॅट क्षमतेचा हा ऊर्जा प्रकल्प आता कार्यान्वित झाल्याने कार्यालयीन दररोज 50 किलो वॅट वीज कार्यालयीन कामकाजासाठी उपलब्ध होणार आहे. यामुळे सौर ऊर्जेच्या प्रकल्पामुळे विजेची मोठी बचत होणार आहे.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, थोरात कारखान्याने कायम शेतकरी, सभासद, ऊस उत्पादक, कामगार यांचे हित जोपासले आहे. या कारखान्याने शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. विजेच्या वाढत्या मागणीमुळे सर्वत्र विजेचा तुटवडा निर्माण होत आहे अशा परिस्थितीत सौर ऊर्जा ही काळाची गरज बनली आहे. आगामी काळामध्ये कारखान्याने नवीन प्रशासकीय इमारतीवर उभारलेल्या हा प्रकल्प इतर कारखान्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. नुकताच संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाने दूध संघाच्या परिसरात 1335 किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला आहे. यामुळे वीस बचतीचा खर्च वाचणार असून त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार असल्याचे ते म्हणाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



