ब्रेकिंग

लोकनेते बाळासाहेब थोरात व आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून रुग्णांना 2 कोटी 6 लाखांची मदत

लोकनेते बाळासाहेब थोरात व आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून रुग्णांना 2 कोटी 6 लाखांची मदत
जाहिरात मो-7756055359

यशोधन कार्यालयाचा तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा
संगमनेर । प्रतिनिधी । तालुक्यातील जनतेच्या कायम सुख दुःखात सहभागी असणारे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते मा.महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना वैद्यकीय मदतीसाठी मोठा दिलासा देताना तालुक्यातील 184 रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या अंतर्गत 2 कोटी 6 लाख 35 हजार रुपयांची मदत मिळून देण्यासाठी यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून या रुग्णांना मदत केली आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयामध्ये नागरिकांना वैद्यकीय सुविधा व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यरत आहे. या अंतर्गत या वर्षांमध्ये 184 रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता योजनेमधून 1 कोटी 84 लाख रुपये, तर टाटा ट्रस्ट, श्री.सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई, इफको कंपनी, श्री.साईबाबा संस्थान शिर्डी यांच्या माध्यमातून 22 लाख रुपयांची मदत या रुग्णांना मिळून देण्यात आली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेले आजार आणि या आजारांवर होणारा खर्च हा सर्वसामान्य माणसांना परवडणारा नसतो. कुटुंबामध्ये आलेला आजार हा त्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था कोलमडून टाकतो. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा याकरता शासकीय योजनांच्या माध्यमातून यशोधन कार्यालयाच्या वतीने पाठपुरावा करून या गरजू नागरिकांना मदत मिळून दिली जात आहे.या अंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व विविध धर्मदाय संस्थांच्या वतीने गरजू नागरिकांना मदत करण्यात येते. याकरता हॉस्पिटल मधील अपेक्षित खर्च, आधार कार्ड, रेशन कार्ड, वैद्यकीय दाखला, या कागदपत्रांसह यशोधन कार्यालयाकडून सातत्याने पाठपुरावा करून मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यामधून नागरिकांना मदत मोठी मिळवून दिली आहे.याचबरोबर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने तालुक्यामध्ये विविध ठिकाणी सातत्याने आरोग्य शिबिर घेण्यात आली आहे. या आरोग्य शिबिरांमधून 2253 नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तर डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांकरता विशेष कॅन्सर तपासणीचे 12 शिबिर घेण्यात आले यामधून 912 महिलांची कॅन्सरच्या विविध तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामधून काही महिलांना प्राथमिक लक्षणे आढळल्याने त्यांना पुढील उपचारासाठी एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून वैद्यकीय उपचार केले जात आहे.तसेच संगमनेर तालुक्यामध्ये विविध हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणाऱ्या नागरिकांना बेड साठी किंवा बिल कमी करण्यासाठी हा कक्ष काम करत आहे. आरोग्य सेवेच्या लाभाकरता तालुक्यातील नागरिकांनी तातडीने यशोधन कार्यालय मध्ये संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. याकरता 7020641296 अविनाश आव्हाड यांच्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

वैद्यकीय मदतीसाठी यशोधनचा पाठपुरावा कौतुकास्पद – डॉ.जयश्रीताई थोरात

तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य माणसांना आजाराचा खर्च परवडत नसून या सर्वांना तातडीने मदत मिळावी याकरता माजीमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजूंना मदत मिळवून दिली जात आहे. याचबरोबर विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे घेऊन मोफत तपासण्या केल्या जात आहे. महिलांच्या कॅन्सर तपासणी मधून 912 महिलांची तपासणी करण्यात आली यामध्ये काही महिला पॉझिटिव्ह आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून उपचार केले जात आहे. पहिल्या स्टेजमध्ये कॅन्सर पूर्ण बरा होत असून या पुढील काळातही कॅन्सर तपासणी शिबिरामध्ये जास्तीत जास्त महिलांनी आपली आरोग्य तपासणी करावी.

डॉ.जयश्रीताई थोरात (कॅन्सरतज्ञ तथा तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस संगमनेर )
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!