ब्रेकिंग

अखेर पत्रकार जाधव यांचेवर पिस्तूल रोखून धमकी दिल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल.

पत्रकार संरक्षण कायदा व आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल.

अखेर पत्रकार जाधव यांचेवर पिस्तूल रोखून धमकी दिल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल.

जाहिरात मो-7756055359

पत्रकार संरक्षण कायदा व आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल.

घारगाव । प्रतिनिधी । संगमनेर तालुक्यातील पठार भागातील मुळा नदी पात्रातून होणारी अवैध वाळू उपसा, तसेच पारनेर तहसीलदार यांनी तक्रारदाराचा नाम उल्लेख करत सराईत वाळूतस्करांना नोटीस बजावल्या.तर अकलापूर येथील शेतकऱ्याच्या गाडीवर वाळूचा डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराच्या घरात तीन वाळू तस्कर घुसले.त्यापैकी दोघांनी कमरेला लावलेले पिस्तूल त्याच्यावर रोखत जीवे मारण्याची धमकी दिल्याने लोकशाहीचा गळा दाबणारी गंभीर घटना बुधवार दि.१७ जून रोजी रात्री आठ वाजता घडली आहे.घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने अखेर मंत्रालयात आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर घारगाव पोलिसात महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे प्रतिबंध अधिनियम,व शस्त्र अधिनियम नुसार विविध कलमान्वये तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु पठार भागामध्ये अवैध वाळू तस्करी अवैध गौण खनिज उत्खनन, जुगार,मटका ,गांजा, अवैध देशी विदेशी दारूची विक्री,चोऱ्या,खून बलात्कार ,दरोडे,अशा घटनांनी साकुर पठार भाग प्रचलित झाले, कायदा व सुव्यवस्था विस्कळीत झाली असून साकुर पठार भाग बिहारच्या मार्गावर वाटचाल करत आहे साकुर गावामध्ये पत्रकारिता व्यवसाय करणाऱ्या सहदेव भिकाजी जाधव यांचे घरात घुसून दोघा सराईत वाळूतस्करांनी पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा निंदनीय प्रकार घडला असून लोकशाही मोडीस काढण्याचा प्रयत्न झाला आहे.यापूर्वी पत्रकार जाधव यांनी जिल्हा अधिकारी अहिल्यानगर यांना अवैध वाळू उपसा रोखणे बाबत निवेदन दिले होते. त्यानुसार तक्रारदाराचे नाव गुपित न ठेवता.पारनेर तहसीलदार यांनी मुळा नदीकाठच्या सराईत वाळूतस्कारांना नोटीस बजवताना पत्रकार सहदेव जाधव यांचा नावाचा उल्लेख करत नोटीस बजावली होती.तर सोमवार दि.१५ जून कन्हेर पोखरी गावामधील पवळदरा येथे अवैधरिता वाळुची वाहतुक होते. त्यामध्ये शेतकरी बाळासाहेब फापाळे, रा. अकलापुर ता.संगमनेर यांचे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने त्यांनी वाळू तस्करांना संबंधित ठिकाणावरून वाळू वाहतूक करण्यास प्रतिबंध केल्याचा राग मुजोर वाळू तस्करांना आल्याने शेतकऱ्याच्या वॅगनर कारला समोरासमोर धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचेवर आळेफाटा येथील माऊली हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना या घटनेचे वृत्तांकन करण्यात आले होते.

या दरम्यान लोकशाहीचा घात करू पाहत असलेला तीन सराईत वाळू तस्करांनी पत्रकार जाधव यांचे घराची रेकी केली.रात्री ८ वा. जाधव त्यांचे कुटुंबांसह घरात असताना अजित मोरे रा.मोरेवाडी नांदूर खंदरमाळ ता.संगमनेर सदर आरोपी व त्याच्यासोबत अनोळखी दोघे जण घरात घुसले.मोरे याला काय काम आहे विचारले असता त्याने सांगितले तुम्ही केलेल्या बातमी मधील डंपर माझा आहे.परंतु सदर बातमीमध्ये डंपरच्या क्रमांकाचा अथवा मालकाचा नामउल्लेख केला नसल्याचे जाधव यांनी सांगितले. तेव्हा मोरे म्हणाला तुम्ही पुन्हा बातमी करु नका,तुम्हाला बातमी न करण्यासाठी किती पैसे देवु. मी तुम्हाला दहा हजार रुपये, वीस हजार रुपये, पंन्नास हजर रुपये लगेच जागेवरच देतो. परंतु जाधव यांनी पैसे घेण्यास नकार दिल्याने आरेरावीच्या भाषेत बोलत त्या दोघांनी त्यांचे कंबरेला लावलेले पिस्तुल काढुन म्हणाले की आम्हाला प्रेमाने देखील सांगता येते तसेच ठोकता देखील येते. माझ्या नादाला लागशील तर तुला गाडीच्या चाका खाली घालीन. अशी धमकी देत पलायन केले.या घटनेबाबत सोमवार दि.२२ जून रोजी जाधव व त्यांचे कुटुंब घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार होता.त्यामुळे जाधव यांनी रात्रभर पोलीस ठाण्याच्या पायरीवर बसून त्यांना गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. परंतु याप्रकरणी फक्त जाधव यांचा तक्रार अर्ज घेतला. या घटनेचा पुढील तपास करत असताना घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी अखेर पोलिसात महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे प्रतिबंध अधिनियम,व शस्त्र अधिनियम नुसार विविध कलमान्वये तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. दरम्यान साकुर पठार भागामध्ये वाळू तस्करांचा आका उदयास आला आहे. महसूलचे अधिकाऱ्यांवर हुकूम गाजवत अवैध धंद्यांना खतपाणी घालण्याचे काम होत आहे. ज्याप्रकारे अन्न व औषध प्रशासनामध्ये कारवाई झाल्यावर आरोपींवर मकोका कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याच प्रकारे साकुर पठार भागामध्ये संघटित गुन्हेगारी वाळू तस्कर अवैध गुटखा विक्री अवैध दारू विक्री अवैध गांजा विक्री तील आरोपींवर मकोका कायदा अंतर्गत कारवाई होणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे करत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!