ब्रेकिंग
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा


सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
संगमनेर । प्रतिनिधी । अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. कृषी विस्तार विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली योगसत्राचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. वाघ, शासकीय कृषी महाविद्यालय, काष्टी-मालेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रम अधिकारी व रावे (RAWE) समन्वयक डॉ. राहुल खुळे हे विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. तसेच प्रशासकीय अधिकारी प्रा. जी. बी. बाचकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. राहुल खुळे यांनी योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विशद केले. प्राचार्य डॉ. आर. एस. वाघ यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



