ब्रेकिंग
स्वच्छ संगमनेर साठी नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांची दररोज सकाळी पाहणी
आजी-माजी नगराध्यक्षांची विकासदृष्टी; संगमनेरच्या भविष्यासाठी सासू-सुनेची सकाळची पायपीट

स्वच्छ संगमनेर साठी नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांची दररोज सकाळी पाहणी

आजी-माजी नगराध्यक्षांची विकासदृष्टी; संगमनेरच्या भविष्यासाठी सासू-सुनेची सकाळची पायपीट
संगमनेर । प्रतिनिधी । शहराचा विकास हा केवळ कागदावरील आराखड्यांमधून होत नाही, तर तो रस्त्यावर उतरून, नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष पाहून आणि त्या सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घेण्याच्या वृत्तीतून घडत असतो. लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरच्या नगराध्यक्ष डॉ सौ मैथिलीताई तांबे दररोज सकाळी स्कुटी गाडीवरून विविध प्रभागांना भेट देत स्वच्छतेची पाहणी करत असून नागरिकांच्या समस्या जाणून घे तात्काळ सूचना करत आहेत.सध्या संगमनेर शहरात वेगळी आणि सकारात्मक कार्यपद्धती पाहायला मिळत आहे. शहराच्या माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे आणि विद्यमान नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे या दोघी दररोज पहाटे सहा ते दहा वाजेपर्यंत शहर आणि उपनगरांमध्ये फेरफटका मारत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. नगरपालिकेच्या कामकाजावर लक्ष ठेवत त्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत.
शहरातील एखादा रस्ता खराब असल्याचे दिसले, एखाद्या भागात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला, कचरा उचलण्यात त्रुटी आढळल्या किंवा इतर नागरी सुविधा अपुऱ्या असल्याचे निदर्शनास आले, तर त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या जात आहेत. त्यामुळे नगरपालिकेचे कर्मचारीदेखील आता अधिक सतर्क आणि जबाबदारीने काम करताना दिसत आहेत. सौ.दुर्गाताई तांबे यांनी गेली पंधरा वर्षे नगराध्यक्ष म्हणून संगमनेर शहराचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या कार्यकाळात शहराच्या विकासाला एक दिशा मिळाली. स्वच्छता, पायाभूत सुविधा, नियोजनबद्ध विकास आणि नागरिकांशी थेट संवाद या बाबींना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. आज त्याच परंपरेचा वारसा डॉ. मैथिलीताई तांबे समर्थपणे पुढे नेत असल्याचे चित्र दिसत आहे.

नगराध्यक्षा म्हणून डॉ. मैथिली तांबे यांचा कार्यकाळ अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असला तरी त्यांच्या कामकाजात आत्मविश्वास आणि दूरदृष्टी स्पष्टपणे जाणवते. यामागे लोकनेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे,. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ,सौ दुर्गाताई तांबे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांची आधुनिक विकासदृष्टी सातत्याने मिळत आहे.अलीकडेच सकाळच्या अशाच एका पाहणी दौऱ्याचा शेवट बसस्थानक परिसरातील आहेर कट्ट्यावर झाला. शहराच्या विविध भागांची पाहणी करून आलेल्या दुर्गाताई तांबे आणि डॉ. मैथिली तांबे यांनी येथे उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. पायी चालून घामाने चिंब झालेल्या या दोघींची उपस्थितीच नागरिकांना वेगळा संदेश देणारी होती. शहराचा प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्षा स्वतः रस्त्यावर उतरून समस्या पाहत असल्याचे चित्र नागरिकांसाठी आश्वासक ठरत आहे.यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते निखिल पापडेजा, सतीश आहेर आणि संतोष मुर्तडक उपस्थित होते. आहेर कट्ट्यावर चहाच्या कपासोबत रंगलेल्या चर्चेत शहरातील स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, वृक्षारोपण, बसस्थानक परिसरातील सुविधा तसेच आगामी विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील समन्वयातूनच शहराचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.शहरातील स्वच्छतेबाबत दोन्ही नगराध्यक्षा विशेष संवेदनशील असल्याचे त्यांच्या पाहणी दौऱ्यांतून दिसून येते. एखाद्या भागात कचरा साचलेला दिसला तर तत्काळ त्याची दखल घेतली जाते. स्वच्छतेची कामे नियमित होत आहेत की नाहीत, नागरिकांना कोणत्या अडचणी येत आहेत, याची माहिती त्या प्रत्यक्ष घेतात. त्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होत आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आणखी एक विशेष बाब लक्ष वेधून घेते.संगमनेरच्या विकासासाठी ‘व्हिजन २.०’ची संकल्पना पुढे नेताना शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नियोजन केले जात आहे. वाढती लोकसंख्या, वाहतुकीचे प्रश्न, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि आधुनिक नागरी सुविधा यांचा विचार करून पुढील वाटचाल सुरू आहे. आज संगमनेरमध्ये जे चित्र दिसत आहे, ते केवळ एका नगराध्यक्षाचे काम नाही. ती एक परंपरा आहे, एक विचार आहे आणि शहराच्या विकासासाठी झटणाऱ्या कुटुंबाची सामूहिक बांधिलकी आहे. सासू-सुनेची ही जोडी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करत असल्यामुळे नागरिकांमध्येही सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. नगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढवून विकासाला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. संगमनेरच्या विकासासाठी आजी-माजी नगराध्यक्षांनी स्वीकारलेली ही कार्यपद्धती आदर्श ठरणारी आहे.