ब्रेकिंग

तरुणांनी व्यसनाच्या विळख्यापासून दूर रहावे – पो.नि. संभाजी गायकवाड

तरुणांनी व्यसनाच्या विळख्यापासून दूर रहावे – पो.नि. संभाजी गायकवाड
जाहिरात मो-7756055359
तरुणांनी व्यसनाच्या विळख्यापासून दूर रहावे – पो.नि. संभाजी गायकवाड
कोपरगाव । प्रतिनिधी । रयत शिक्षण संस्थेच्या श्री ग.र. औताडे पाटील विद्यालय पोहेगाव येथे जागतिक अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान साजरे करण्यात आले.
जागतिक अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान अंतर्गत कोपरगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड यांनी व्यसनांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्ती आवश्यकता याविषयक सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच सायबर गुन्हेगारी , सोशल मिडीयाचा अति वापर केल्यामुळे होणारे संभाव्य धोके , भारतीय दंड संहिता मधील विविध कायदे, विद्यार्थी दशेत व्यायाम, शिस्त यांचे महत्त्व  सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच संकटसमयी ११२ क्रमांकवर संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्यानंतर पोहेगाव गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी प्रारंभी स्थानिक स्कूल  कमिटीचे ज्येष्ठ सदस्य  नंदकुमार औताडे पाटील यांनी पो.नि. संभाजी गायकवाड यांचे तर  मधुकरराव औताडे पाटील यांनी  पोहेगावचे पोलीस पाटील जयंत रोहमारे यांचे व उपस्थित सर्व पोलीस कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व  सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक  महेंद्र काळंगे यांनी केले विद्यालयाचे प्राचार्य  विजयजी भोसले यांनी मान्यवरांचे आभार मानले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  सुनील वाघमारे, राठोड, सांगळे  , पवार,  लहिरे , सूर्यवंशी , पाटील,  पडवळे,  भारमल ,  वराडे श्रीमती बागुल, श्रीमती वायाळ,यांचे सह सर्व शिक्षक , शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!