ब्रेकिंग

आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश देत ‘प्रवरा रिअल एक्सरसाईज ग्रुप’ची लोणी ते पंढरपूर सायकल वारी

४५ वारकरी होणार सहभागी

आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश देत ‘प्रवरा रिअल एक्सरसाईज ग्रुप’ची लोणी ते पंढरपूर सायकल वारी

जाहिरात मो-7756055359

४५ वारकरी होणार सहभागी

लोणी । प्रतिनिधी । आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर सहकार पंढरी लोणी बुद्रूक येथून ‘प्रवरा रिअल एक्सरसाईज ग्रुप’च्या वतीने येत्या १० ते १२ जुलै २०२६ या कालावधीत ‘लोणी ते पंढरपूर’ सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तीमय वातावरणात निघणारी ही सायकल दिंडी पंढरपूर येथील ऐतिहासिक आणि मानाच्या सायकल रिंगणातही विशेष सहभाग नोंदवणार असल्‍याची माहीती दिंडीचे संचालक भाऊसाहेब विखे व उदय पोकळे यांनी दिली.

गेल्या काही वर्षांत आषाढी वारीमध्ये सायकल वारीचे आकर्षण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ‘प्रवरा रिअल एक्सरसाईज ग्रुप’च्या वतीने काढण्यात येणाऱ्या या सायकल वारीचे यंदाचे हे सलग दुसरे वर्ष आहे. ‘प्रदूषणमुक्त पर्यावरण’ आणि ‘धावपळीच्या युगात निरोगी आरोग्यासाठी सायकल चालवा’ हा सामाजिक संदेश घेऊन हे सायकल वारकरी पंढरीच्या दिशेने पेडल मारणार आहेत. या ग्रुपने यापूर्वी लोणी ते आळंदी आणि लोणी ते त्र्यंबकेश्वर अशा धार्मिक वारीचे यशस्वी नियोजन केले आहे. तसेच, हा ग्रुप दैनंदिन ३० किलोमीटर सायकल प्रवासासोबतच राज्यातील विविध गड-किल्ल्यांवर ट्रेकिंगचे उपक्रम राबवित आहे.यंदाच्या या पंढरपूर सायकल दिंडीमध्ये एकूण ४५ सायकल वारकरी विठूनामाच्या जयघोषात सहभागी होणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांपासून ते तरुण सायकलपटूंचा समावेश आहे. वारी दरम्यान कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये आणि सर्व वारकऱ्यांची सुरक्षा अबाधित राहावी, यासाठी ग्रुपच्या वतीने शिस्तबद्ध ‘सिंगल लाईन’ सायकल चालवण्याची नियमावली तयार करण्यात आली आहे. सर्वांसाठी एकसमान पोशाख आणि सुरक्षेसाठी हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे.या सायकल वारीदरम्यान वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून दिंडीसोबत एक पर्यायी वाहन देखील असणार आहे. यामध्ये प्रथमोपचार किट, आणि आवश्यक औषधे तसेच लांबच्या प्रवासात सायकल खराब झाल्यास ती जागेवरच दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक साहित्य असणार आहे.दिनांक १० जुलै २०२६ रोजी पहाटे ५:०० वाजता लोणी बु्द्रूक गावचे ग्रामदैवत श्री म्हासोबा महाराजांना अभिषेक आणि आरती करून ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. पहिल्या दिवशी एकूण १३७ किलोमीटरचे अंतर पार करून ही दिंडी ‘मुक्ताई मंगल कार्यालय, माहिजळगाव’ येथे रात्रीच्या भोजनासाठी व मुक्कामासाठी विसावेल. दुस-या दिवशी दिनांक ११ जुलै २०२६ रोजी शनिवारी सकाळी मौजे माहिजळगाव येथून विठ्ठलाच्या जयघोषात दिंडी पंढरपूरकडे रवाना होईल. दुपारी ४:०० वाजता या सायकल दिंडीचे पंढरपूरच्या पवित्र भूमीत आगमन होणार आहे. रविवार दिनांक १२ जुलै रोजी पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध व भव्य सायकल रिंगणात हे ४५ वारकरी सहभागी होणार आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!