ज्ञानगंगा विद्यानिकेतनच्या सहा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत झेप

ज्ञानगंगा विद्यानिकेतनच्या सहा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत झेप


ज्ञानगंगा विद्यानिकेतनच्या सहा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत झेप
आश्वी । प्रतिनिधी । संगमनेर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या मांचीहिल येथील ज्ञानगंगा विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मृण्मयी गंगाधर चिंधे, शुभश्री शशिकांत देशमुख, श्रीराज संदीप गव्हाणे, श्रेणिक श्रीराम गुंड, ऋतुराज योगेश कासार आणि कु.रुचिका मदन भुसाळ यांचा समावेश आहे.या यशासाठी बाबासाहेब गवते, सुनील अंगरखे, किशोर कारले, अर्चना तांबे, शशिकांत देशमुख, शीतल निघुते, पद्मा ताजणे, सारिका खेमनर आणि प्रा. विजय पिसे यांनी या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मुख्याध्यापिका योगिता दुकळे, प्राचार्य विजय पिसे, संस्थेच्या संचालिका नीलिमा गुणे, विश्वस्त शैलेंद्रसिंह होडगर, दिग्विजय होडगर तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शालिग्राम होडगर यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या या यशामुळे ज्ञानगंगा विद्यानिकेतनच्या गुणवत्तापूर्ण व विद्यार्थीकेंद्री शिक्षणपद्धतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून परिसरातून विद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



