ब्रेकिंग

पोलीस भरतीसाठी वार्षिक वेळापत्रकाची मागणी; आमदार सत्यजीत तांबे यांच्या सूचनेची सरकारकडून दखल

पोलीस भरतीसाठी वार्षिक वेळापत्रकाची मागणी; आमदार सत्यजीत तांबे यांच्या सूचनेची सरकारकडून दखल

जाहिरात मो-7756055359

स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर पोलीस भरतीचे ‘वार्षिक वेळापत्रक’ तयार करण्याबाबत राज्यमंत्र्यांकडून सकारात्मक आश्वासन

मुंबई । प्रतिनिधी । राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षार्थी आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी मागणी महाराष्ट्र विधानपरिषदेत आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडली. म.वि.प. नियम ९३ अन्वये सूचना क्रमांक २६ द्वारे त्यांनी बुधवार, दि. ८ जुलै रोजी राज्यातील पोलीस भरती आणि इतर सरळसेवा पदभरतीसाठी वार्षिक वेळापत्रक (Annual Calendar) जाहीर करण्याबरोबरच प्रलंबित भरती प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्याची मागणी केली.सभागृहात बोलताना आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, राज्यातील लाखो युवक-युवती, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीसाठी अनेक वर्षे मेहनत घेत आहेत. अभ्यासिका, मैदाने आणि प्रशिक्षण केंद्रांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी तयारी करत असले तरी भरती प्रक्रियेचे निश्चित वेळापत्रक नसल्याने त्यांचे नियोजन विस्कळीत होते. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण होते.

यूपीएससी, एमपीएससी, रेल्वे तसेच तामिळनाडू आणि केरळ राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. वर्षाच्या सुरुवातीलाच विविध भरती प्रक्रिया आणि परीक्षा कधी होणार, याचे स्पष्ट नियोजन उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन प्रभावीपणे करता येईल, असे त्यांनी नमूद केले.यावर उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी या मागणीची दखल घेतली. एमपीएससीप्रमाणेच पोलीस भरती प्रक्रियेसाठी वार्षिक वेळापत्रक तयार करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. सदस्यांच्या सूचनेनुसार सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल तसेच पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.सरकारच्या या सकारात्मक भूमिकेमुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल. तसेच भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!