पिंपळस महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ उत्साहात साजरा
पिंपळस महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ उत्साहात साजरा
पिंपळस । गायत्री शिरसाट ।
के.के. वाघ शिक्षणसंस्था संचलित, के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय भाऊसाहेबनगर, पिंपळस (रामाचे) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत ‘राष्ट्रीय सेवा दिन‘ उत्साहात साजरा करण्यात आला. २४ सप्टेंबर हा दिवस सर्वत्र रा.से.यो. दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने के. के. वाघ महाविद्यालयात रा.से.यो. दिनाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमासाठी प्रा. भगवान बैरागी (सहा. प्राध्यापक सायखेडा महाविद्यालय) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा. रविंद्र राऊत यांनी कार्यक्रमाचा हेतु व उद्देश प्रस्ताविकाद्वारे स्पष्ट करून दिला. प्रमुख अतिथी प्रा. भगवान बैरागी यांनी तरुणाचा राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभाग या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्याना रा.से.यो. दिनाची पार्श्वभूमी व इतिहास, रा.से.यो दिनाचे महत्व याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच तरुणामध्ये श्रमनिष्ठा, राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागावी , युवा शक्तीचा योग्य वापर व्हावा म्हणून रा. से. यो. ही एक उत्तम व्यसपीठ आहे असे प्रतिपादन केले. रा.से.यो. दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एल. जाधव होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी तरुणामध्ये राष्ट्रप्रेम जागतृ झाले पाहिजे, विद्यार्थ्यांध्ये सेवावृत्ती निर्माण व्हावी आणि स्वावलंबनाची सवय व शिस्त लागावी यासाठी विद्यार्थ्यानी रा. से. यो.मध्ये सहभाग घेतला पाहिजे असे आवाहन केले. रा.से.यो. दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनीता शिरसाठ यांनी तर पाहुण्यांचा परिचय व आभारप्रदर्शन प्रा. उषा गायकर यांनी केले. कार्यक्रमासाठी वरिष्ठ प्राध्यापक प्रा. किरण वाघ, कला विभागप्रमुख डॉ. भावना पौळ, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. ज्ञानेश्वरी तासकर यासह प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.